पुन्हा नव्याने - मराठी कविता

पुन्हा नव्याने, मराठी कविता - [Punha Navyane, Marathi Kavita] डोळ्यांतील अवकाश तुझे, क्षीतीज रेषा स्वप्नांची.
पुन्हा नव्याने - मराठी कविता | Punha Navyane - Marathi Kavita
डोळ्यांतील अवकाश तुझे
क्षीतीज रेषा स्वप्नांची
संघर्षाची झेप निनावी
विहंग नव्याने व्हावे म्हणतो
मी धरणीला अखेरचे टाळावे म्हणतो

एक-एक नजरेतील गाणे
मैफील उसळती श्वासांची
मुके सुर अंतरीत निनावी
गीत नव्याने व्हावे म्हणतो
मी शब्दाला अखेरचे टाळावे म्हणतो

कटाक्षातील स्पर्श विजेसम
सभोवताली तमा भयाची
लुकलुकणारा हर्ष निनावी
सुर्य नव्याने व्हावे म्हणतो
मी अस्ताला अखेरचे टाळावे म्हणतो
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.