Loading ...
/* Dont copy */

विघ्नहर्ता करणार का संकटांचं निवारण - टिव्ही

विघ्नहर्ता करणार का संकटांचं निवारण, मराठी टिव्ही - [Vighnaharta Karanar Ka Sankatacha Niwaran, Marathi TV].

विघ्नहर्ता करणार का संकटांचं निवारण - मराठी टिव्ही | Vighnaharta Karanar Ka Sankatacha Niwaran - Marathi TV

स्टार प्रवाहवरील ललित २०५ लेक माझी लाडकी आणि छोटी मालकीण मालिकेचा महासंगम एपिसोड

आपल्या सर्वांचं लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा. या लाडक्या दैवताची आपण वर्षभर आतुरतेने वाट पहात असतो. ‘ललित २०५’ या मालिकेतलं राजाध्यक्ष कुटुंबही गेले कित्येक वर्ष बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलंय.

यंदा मात्र त्यांची ही प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. धाकटी सून भैरवी राजाध्यक्षांची ही इच्छा पूर्ण करणार आहे. भैरवीच्या पुढाकारामुळेच यंदा राजाध्यक्षांच्या घरी गणपती बाप्पाचं थाटामाटात आगमन होणार आहे.

राजाध्यक्षांच्या या आनंदात ‘छोटी मालकीण’ आणि ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेचे कलाकारही सहभागी होणार आहेत.

सणाच्या निमित्ताने का होईना आपापसातले हेवेदावे विसरुन राजाध्यक्ष कुटुंब एकत्र आलंय, मनात मात्र कटुता कायम आहे. बाप्पाच्या येण्याचा आनंद जरी असला तरी भैरवीमुळे हा आनंद घरात आलाय ही गोष्ट नीलिमा आणि गार्गीला खटकतेय. त्यामुळे भैरवीच्या आनंदात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न या दोघी करणार आहेत.

यंदा राजाध्यक्षांच्या घरी गणपती बाप्पाचं थाटामाटात आगमन
यंदा राजाध्यक्षांच्या घरी गणपती बाप्पाचं थाटामाटात आगमन

राजाध्यक्ष कुटुंबही गेले कित्येक वर्ष बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलंय
राजाध्यक्ष कुटुंबही गेले कित्येक वर्ष बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलंय

आता नीलिमा आणि गार्गीचा हा प्लॅन यशस्वी होतोय का? भैरवी बाप्पाची पूजा निर्विघ्नपणे पार पाडणार का? छोटी मालकीण आणि लेक माझी लाडकीमधले कलाकार या सणाचा आनंद कसा द्विगुणीत करणार? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं गणपती विशेष भागात मिळतील.

तेव्हा पाहायला विसरु नका गणपती विशेष महासंगम रविवार १६ जूनला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची