एक उत्तर हवं होतं - कुठेतरी-काहीतरी

एक उत्तर हवं होतं - कुठेतरी-काहीतरी - [Ek Uttar Hava Hota - Kuthetari-Kahitari] व्हॉट्सअ‍ॅप वर आलेल्या एका प्रतिक्रीयेचे उत्तर; कुठेतरी काहीतरी या संपादकीय मध्ये.
एक उत्तर हवं होतं - कुठेतरी-काहीतरी | Ek Uttar Hava Hota - Kuthetari-Kahitari

डिजे रोजही सुरू ठेवले तरी त्यात त्रासदायक काहीच नाही?

डिजे रोजही सुरू ठेवले तरी त्यात त्रासदायक काहीच नाही; जोपर्यंत ते स्वतःच्या घरात दार बंद करून ऐकले जात असतील

जात आणि धर्मांच्या साखळ्या केवळ राजकीय/व्यावसायिक स्वार्थापोटी विनल्या जातात आणि त्या तोडण्यासाठी कोणत्याही धार्मिक विषयाचा आधार घेऊन विवेकी जनतेस वेठीस धरणे हे निलाजऱ्या सामाजिक भानाची मानसिकता दाखवते.

जनता त्रासात का आहे? त्याचे मूळ शोधत त्रासाला मुळासकट उपटून फेकण्याचे पुरुषत्व नेत्यांत आता उरले नसल्याने; जनतेला धर्म आणि जातीच्या तात्पुरत्या आणि दिशाहीन गुंगाऱ्या देणाऱ्या गोळ्या देण्यास आनंद म्हटले जात आहे.

लोकशाहीत प्रत्येकाच्या विचारांचा आदर होणे गरजेचे/अपेक्षित आहे मात्र आपला विचार दुसऱ्यावर त्याच्या इच्छे विरुद्ध लादणे हा वैचारिक बलात्कारच असतो. वैचारिक बलात्कार करणारे अनेक बलाढ्य आणि सनकी राज्यकर्ते जनतेने मुळासकट उपटून फेकल्याचा इतिहास आहे.

जगाला प्रेम, शांतता, करुणा, दया आणि विवेकाची गरज आहे; जे अंतिम सत्य आहे.
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.