युगायुगांच्या अंधारातून, प्रकाशफुलांचे सडे ओंजळीत
युगायुगांच्या अंधारातूनप्रकाशफुलांचे सडे ओंजळीत
काजव्यातली टिमटिम उर्जा
लुकलुकत्या रात्री सांभाळीत
चंद्र रोजचा सजतो आहे
विश्वाच्या आरंभबिंदूला
तेजाच्या अक्षुण्ण ज्योतीला
तळ्याकडेच्या चिखलामधले
विश्व झोपले ते सांभाळीत
चंद्र रोजचा झिजतो आहे
पाठीवर सपसपता सूर्य
चांदण्यात दिसते माधुर्य
वीजा लख्खकन कातरणाऱ्या
ढगाआडुनी पचवत लपवत
चंद्र रोजचा जळतो आहे
- अभिजित टिळक