जळताना पळणे असे भासते, जणू काळाशी ओघवते लढणे
जळताना पळणे असे भासतेजणू काळाशी ओघवते लढणे
सवय नासली तलवारीची
अंगांगाची होळी झाली
तरी न जळला पीळ लाडका
लाकूड होवून पळी व्हायचा
यज्ञामध्ये ज्वाळेसोबत
राळ होऊनी स्नान घ्यायचा
काळासोबत हलता डुलता
देह अनाहत कातळ झाला
कुण्या देशीच्या जनतेकरिता
वादळातला स्वामी झाला
- अभिजित टिळक