Loading ...

राखी पौर्णिमा (सण-उत्सव)

राखी पौर्णिमा (सण-उत्सव) - बहीण भावाच्या अतूट आणि उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस (Rakhi Pournima, Festivals).

राखी पौर्णिमा - सण-उत्सव | Rakhi Pournima - Festivals

राखी पौर्णिमा / रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या अतूट आणि उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस


राखी पौर्णिमा (सण-उत्सव)

सोनियाच्या ताटी
उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया



खरचं राखी हा बहिण भावाच्या अतूट प्रेम संबंधाचा एक धागा. राखी पौर्णिमेस बहिण भावाला ओवाळते. त्याच्या हातावर राखी बांधते. भाऊ-बहिणीच्या ओवाळणीच्या ताटात एखादा दागिना, भेटवस्तू घालतो आणि बहिण भावाच्या प्रेमाची पोच पावती देते. बहिण भावाला गोड-धोड, मेवा-मिठाई खाऊ घालते.

जसा हा सण घरा-घरांतून साजरा होतो तसाच तो काही संस्था, संघटना, मंडळे ह्यांच्यामार्फत सार्वजनिक स्वरूपात ही साजरा केला जातोय.

अनेक संस्था जवानांना राख्या बांधते. तसेच दवाखाने, अपंग मुलांच्या, अनाथ मुलांच्या संस्थेत जाऊन मुद्दाम तिथल्या मुलांना राखी बांधण्याचे कार्यक्रम केले जात आहेत. कारण त्यामागे राखीचे महत्त्व तर आहेच पण त्याच बरोबर प्रेम वृद्धीगंत करण्याचे उद्दिष्ट असते.

ह्या राखी पौर्णिमेचं दुसरं नांव म्हणजे रक्षाबंधन. ह्याचा अर्थ असा की बहिण एक प्रकारे आपल्या संरक्षाणाची जबाबदारी ही भावावर टाकत असते.

राखीचे बंधन हे जात धर्माचे बंधन पाळत नाही. राखी बांधणारी किंवा भाऊ मानून राखी पाठवणारी बहीण ती त्या भावाची धर्मभगिनी होते आणि तिचं रक्षण करणं हे त्या भावाचे आद्य कर्तव्य बनतं.

ह्याबद्दल उत्तर भारतात एक कथा सांगितली जाते ती अशी


मेवाडची राणी कर्मवती ही एकदा अशाच एका राजकीय संकटात सापडली. मेवाडची शूर सेना पराक्रमाची शिकस्त करत होते, चिवट झुंज देत होते पण मोगलांच्या प्रचंड संख्येपुढे त्याची ताकद कमी पडत होती. त्यावेळी त्या मेवाडच्या राणीनं काय केलं ठाऊक आहे; तिनं बादशहा हुमायुन ह्याला एक राखी पाठवली आणि सोबत एक पत्र बहिणीच्या रक्षणाचं. मुसलमान शत्रूच्या हल्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी घेतलेली धाव आणि ती सुद्धा एका मुसलमान बादशहाकडे.

तो धावून येईल कां? तो मदत करेल का? अशी शंका मनात येणं स्वाभाविक होतं. पण तसं काही झालं नाही. राणीनं पाठवलेल्या राखीचा आदर करीत अन्‌ तिने मागितलेलं रक्षण ह्यासाठी हुमायुन कर्मवतीच्या मदतीसाठी धावून आला. स्वधर्मीयांशी युद्ध करून त्यानं आपल्या ह्या धर्माच्या बहिणीला संरक्षण दिलं. हे आणि असं प्रचंड सामर्थ्य आहे त्या प्रेमळ राखीत.

कोकणामध्ये हा दिवस नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. कोळी समाज ह्या दिवशी सागर राजाचं पूजन करतो. त्याला नारळ अर्पण करतो आणि प्रार्थना करतो की: “हे सागर राजा! आमच्यावर कृपा कर. तू आमच्या दाता आहेस. तू आम्हाला ह्या तुझ्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या तुझ्या लेकरांना तुझी सागर संपत्ती भरभरून दे. मासेमारी व्यापार ह्यांत आम्हाला यश दे. आमचा सांभाळ कर.”

श्रावण पौणिमेच्यादिवशी साजरे होणारे हे दोन सण; एक रक्षाबंधन / राखी पौर्णिमा आणि दुसरा नारळी पौर्णिमा.

नाव जरी भिन्न आली तरी दोन्हीकडे मागणी मात्र एकच - संरक्षणाची. एक बहिणीची भावाला तर दुसरी जीवनदात्या सागर राजाला.


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची