माझी सर्व बोटे सारखीच (मराठी कविता)

माझी सर्व बोटे सारखीच, मराठी कविता - कवी तनवीर सिद्दिकी यांची एक मार्मिक कविता माझी सर्व बोटे सारखीच.
माझी सर्व बोटे सारखीच - मराठी कविता
माझी सर्व बोटे सारखीच (मराठी कविता), छायाचित्र: हर्षद खंदारे.
कवी तनवीर सिद्दिकी यांची एक मार्मिक कविता माझी सर्व बोटे सारखीच.

स्वतंत्र देशात जन्मही झाला प्रत्येक ‘दिनी’ झेंडाही खिश्याला कधी हारे-तुरे केली, कधी नारे - ‘खा’ रे केली अर्ध्या सुट्टीसाठी भाषणाला टाळीही दिली पण जरा कुठे देशभक्तीची अंगावर संधी असली ...तर मी करंगळी दाखवतो...! (थोडा बिझी रे...) सवलत-कायद्यात शाळा होतकरू फायद्यात गाळा आयकर ढापून ‘माळा’ अस्सल सज्जनतेचा चाळा पण जरा कुठे फुकटची कौतुक अंगठी दिसली ...तर मी अनामिका दाखवतो...! (आभार... आभार...) कधी भासतो बोंबलणारा भ्रष्टाचार कधी त्रासतो माजलेला हाहाकार कधी हासतो दैवातला अत्याचार कधी दिसतो नसत्याचा प्रचार पण जरा कुठे स्वार्थ-स्वत्वाची आकडेमोड चुकली ...तर मी मधलं बोट दाखवतो...! (...@#$%^$...) कोणी प्रहार करावं म्हणतो ज्वलंत शब्दाची पुकार बनतो सर्व लाचारांना उठवतो चांगल्या विचारांनी पेटवतो पण जर कुठे ‘मेणबत्ती’ विश्वासाने दारावर आली ...तर मी तर्जनी दाखवतो..! ...(पुढे जा ना त्या घरी ...तो जाणारेय...!) मग संप होतात... बंद होतो... नकळत अन्यायाचा गंध होतो कोणी पळत... काहीतरी जळत... आपलंच नुकसान... नंतर कळत... पण जरा कुठे सर्व पूर्ववत सकाळ-दुपार झाली ...तर मी अंगठा दाखवतो...! (जिंकलो रे... खरंच?) पण मी काय करणार? माझी सर्व बोटे सारखीच...! तुम्ही आपली बघा जरा... फरक आहे? (आयला... तुमची पण...!)

- तनवीर सिद्दिकी

1 टिप्पणी

  1. कविता आवडली.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.