Loading ...

प्रीत अशीच बहरते - मराठी कविता

प्रीत अशीच बहरते, मराठी कविता - [Preet Ashich Baharate, Marathi Kavita] निळ्या आभाळी, निलांबरी तू.

प्रीत अशीच बहरते निळ्या आभाळी
निलांबरी तू
निशिदिनी नभी अवतरते
तुला बघूनी निशिकांत ही नटला
रजनीत निळाई उतरते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

कातरवेळी
कृष्णसावळी तू
कोमल कामालिनी होते
तुला बघूनी श्याम ही शामल
कुंदेची कळी उमलते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

दूर असूनी
लाजरीच तू
नित लाजाळू होते
लाख लपविते परी उलगडते
लाखात एक तू शोभते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

सोनपिवळी
पीतांबरी तू
हिरण्यवर्णी होते
धमक हळदी जणू शेवंती
सोनेरी शाल पांघरते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

लाल डाळिंबी
गुलाबी कळी तू
रक्तांबुज लक्ष्मी झाली
जर्द तांबडी लाजूनी लाली
गाली हळुवार उतरते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

श्वेतवर्णी
शुभ्र शुभ्रा तू
धवल अप्सरा होते
नितळ काया गोरी काया
मोगऱ्यासम सुगंधित होते
सखे, बघ प्रीत अशीं च बहरते

चंदेरी जगात
चंद्रिका तू
चमचम चमकत असते
चंद्र लाजतो तुला पाहतो
सरस चकोरच ठरते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

रंगीत राणी
रंगावली तू
आयुष्यात ही रंग भरले
रंगात रंगुनी तुझ्या संगिनी
देहात रती अवतरते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची