पहिला पहिला पाऊस (मराठी कविता)

पहिला पहिला पाऊस (मराठी कविता) - [Pahila Pahila Paus, Marathi Kavita] पहिला पहिला पाऊस अंगावर होता, गार गारवा झोंबला अंगाला.
पहिला पहिला पाऊस - मराठी कविता
पहिला पहिला पाऊस - मराठी कविता, छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
पहिला पहिला पाऊस - (मराठी कविता) पहिला पहिला पाऊस अंगावर होता, गार गारवा झोंबला अंगाला.

पहिला पहिला पाऊस अंगावर होता गार गारवा झोंबला अंगाला पावसाच्या सरित मात्र स्पर्श तुझाच होता ओठ होते बंद माझे मनात गाणे आपल्या प्रीतीचे स्मृतींनी गेला कंठ दाटुनी मातीतून उठला गंध कस्तुरी उदास निर्जीव वेलीला आठवणीचा बहर फुलुनी गेला पहिला पहिला पाऊस अंगावर होता पहिला पहिला पाऊस अंगावर होता

- आकाश भुरसे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.