Loading ...
/* Dont copy */

जातबळी भाग ५ - मराठी भयकथा

जातबळी भाग ५, मराठी कथा - [Jaatbali Part 5, Marathi Katha] आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.

जातबळी भाग ५ - मराठी कथा | Jaatbali Part 5 - Marathi Katha
पुर्वार्ध: राकेश आणि त्याच्या मित्रांना पाहण्यासाठी आकाश हॉस्पिटलला जातो. तिथे रश्मी त्याच्या चांगुलपणाचे राकेश समोर कौतुक करते. भडकलेला राकेश रश्मीच्या मुस्काटात लगावतो. रश्मी रागाच्या भरात राकेशला खुप मारते. आकाश तिला तिथून समुद्रावर घेऊन जातो. रश्मी आकाशसमोर राकेशच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचते. आकाशला नाकारल्याचा तिला पश्चात्ताप होत असल्याचे सांगते पण आकाश तिला नभाबद्दल सांगतो आणि त्याच्या मनात रश्मीबद्दल काही नसल्याचे तिला जाणवून देतो. नभाची आई गोड बोलून पूनम कडून नभा आणि आकाशच्या प्रेमाबद्दल जाणून घेते. नभाचे वडील तिला आकाशसोबत पळून जाण्याचा सल्ला देतात. कुटुंब आणि आकाश या दोघात सॅन्डविच झालेली नभा टेन्शन मुळे आजारी पडते. नभाची आई आकाशला नभाला भेटू देत नाही म्हणून तो रसिकाला नभाची भेट घेण्याची विनंती करतो. रसिका नभाचे आकाशवरील निस्सीम प्रेम पाहून तिला तिचे प्रेम यशस्वी व्हावे म्हणून शुभेच्छा देउन निघून जाते. रात्री नभाला कोणीतरी मायेने आपल्या डोक्यावरून हात फिरवत असल्याचे जाणवते. ती उठून पहाते पण तिला कोणीच दिसत नाही. पुढे चालू...

तिच्या खोलीत पुर्ण अंधार पसरला होता. कसे बसे उठत तिने लाईट लावला. उजेडाने तिची खोली उजळून गेली. एवढ्यात तिला कोणीतरी हाक मारली असे वाटले. ती स्तब्ध उभी राहिली व कानोसा घेऊ लागली. "आकाश! होय तो आकाशचाच आवाज होता" ती स्वतःशीच म्हणाली. पण माझा आकाश यावेळी इथे कसा येऊ शकेल? मला भास होत आहेत. तू कुठे आहेस आकाश? मला नाही इथे राहायचे, मला तुझ्या सोबत घेऊन चल. माझे मन इथे बिलकुल लागत नाही." नभा ओंजळीत चेहरा लपवून रडू लागली.

“रडू नकोस नभा!” आकाशचा आवाज नभाच्या कानात घुमला. त्याबरोबर नभाने चमकून वर पाहिले. ती तिच्या खोलीत वेड्यासारखी आकाशला शोधू लागली. “आकाश! आकाश, खरंच तू आहेस की मला भास होत आहेत? का मला छळतोयस?” रडवेल्या आवाजात नभा म्हणाली. पुन्हा आकाशचा आवाज आला. “तुला भास नाही होत आहे, मी खरंच आलोय शोना!” “तू आला आहेस तर मग मला दिसत का नाहीस? मला आता वेड लागेल असे वाटू लागले आहे.” नभा डोकं गच्च दाबून धरत म्हणाली.

[next] “अगं तुझ्या आईने आपली ताटातूट केल्यावर माझ्याकडे पर्यायच नव्हता. मी जोशी काकांच्या मागे लागून आत्मा शरीराबाहेर कसा काढायचा आणि इच्छित स्थळी कसे जायचे ते शिकून घेतले आहे आणि तुला भेटण्यासाठी आलोय. माझे शरीर माझ्या घरी आहे, केवळ माझा आत्मा सूक्ष्म रूपाने इथे आलाय. दृश्य रूपात कसे यायचे ते मला अजून माहित नाही पण मी ते लवकरच माहिती करून घेईन आणि मग तू मला पाहू सुद्धा शकशील. अशा प्रकारे तू कुठेही असलीस तरीही आपण भेटू शकू. काय माहित पुढे मागे तू मला स्पर्श पण करू शकशील. पण आत्ता तरी तुला केवळ माझ्या आवाजावर समाधान मानावे लागेल.” आकाशचा आत्मा म्हणाला.

ते ऐकून नभाचा विश्वासच बसेना. कोणी आपल्या शरीरापासून आत्मा कसा वेगळा करू शकतो? आत्मा शरीराबाहेर पडला की मृत्यू, एवढे सोपे गणित तिला ठाऊक होते. तिचे डोकेच काम करेनासे झाले. स्वतःला सावरल्यावर तिने पुन्हा आकाशला आवाज दिला. “आकाश, तू अजूनही आहेस का इथे?” “हो गं राणी! मी इथेच आहे. अगदी तुझ्या जवळ!” आकाशचा आत्मा उत्तरला. त्याच्या उत्तराने नभाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आकाशने केवळ आपल्यासाठी निसर्गाच्या विपरीत अशी अशक्य गोष्ट साध्य केली याचे तिला प्रचंड कौतुक वाटले.

तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. आकाशचा आवाज पुन्हा तिच्या कानावर पडला. “मला आत्ता जायला हवे. लवकरच माझ्या साधनेने मी माझ्या शरीराबाहेर जास्त काळ राहण्याचे कसब आत्मसात करून घेईन. पण तू मला वचन दे की तू आता लवकर बरी होशील. स्वतःचे हाल करून घेणार नाहीस. आता आपल्याला भेटण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे आता सगळी काळजी बाजूला ठेव आणि आनंदात राहा. बघ तुझा वेडोबा तुझ्यासाठी काय काय करतो ते! चल मी निघू आता?” तो जाणार म्हणुन ती हिरमुसली पण आता तिला १० हत्तीचे बळ आले होते.

[next] तिच्या मनाने पुन्हा उभारी घेतली. तिने त्याला वचन दिले आणि तो नेहेमी प्रमाणे तिच्या गालाचे चुंबन घेऊन तिथून निघून गेला. नभाला आपल्या गालावर गुदगुदल्या झाल्यासारखे वाटले. तिने आपले डोळे पुसले आणि लाजत तिच्या खोलीतून बाहेर पडली. समोरच आईला पाहून मात्र तिच्या काळजात धस्स झाले. आईची नजर चुकवून तिने बाथरूममध्ये जाऊन कडी लावली. गरम पाण्याच्या धारांनी तिचे रोम रोम पुलकित झाले. बराच वेळ ती आपल्या शरीरावर गरम पाण्याचा शॉवर घेत होती. आंघोळ केल्यावर तिला खुप फ्रेश वाटू लागले.

तिच्या शरीराचा थकवा आणि मनाची मरगळ क्षणात दूर पळाली. तिच्या मनात आकाशचा विचार आल्यावर ती स्वतःशीच गोड लाजली. ती स्वतःचे रूप आरशात पाहण्यात गुंग असतानाच दरवाजाची कडी वाजली आणि ती भानावर आली. “आले !” म्हणत तिने पटकन आपले कपडे बदलले आणि बाहेर आली. समोर आईला पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. पुन्हा तिची नजर चोरत ती आपल्या रूमकडे जाऊ लागली तसे तिच्या आईने तिला अडवले.

“काय गं मगाशी रसिका आली तेव्हा तर तुझ्या अंगात उठायचे पण त्राण नव्हते आणि आता अचानक असे काय झाले की तू एकदम ठणठणीत बरी झाल्यासारखी दिसतेस? एरव्ही तर तुला अंघोळीला पाच मिनिटे पण पुष्कळ होतात आणि आज चक्क अर्धा तास लागला ते ही मध्यरात्री. काय करत काय होतीस इतका वेळ? आणि मला एक सांग, तुझ्या खोलीत कोणी आलं होत का? तू कोणाशी तरी बोलत असल्यासारखे मला वाटले.” आईच्या या प्रश्नाने नभा एकदम गडबडली पण स्वतःला सावरत म्हणाली, “काहीतरीच काय तुझे?”

[next] “माझ्या खोलीत कोण येणार आहे? तुला भास झाला असेल, आणि किती प्रश्न विचारतेस गं एका वेळेला? मी बरी झाल्याचं तुला काहीच नाही, संशय घेत बस नुसता!” असे म्हणुन तिने वैतागून आपल्या खोलीत जाऊन कडी लावून घेतली. कधीही आईला उलट उत्तर न देणारी नभा आज खुप काही बोलून गेली होती. तिच्या आईला आणि नभाला स्वतःलाही याचे आश्चर्य वाटले. नभा आता लवकरच आपल्या वर्चस्वाला झुगारून देऊ शकते याची जाणीव तिच्या आईला झाली. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने रवीला फोनवर याची कल्पना दिली.

आता रोज रात्री निजानीज झाल्यावर आकाशचा आत्मा आपल्या शरीराला घरात सोडून नभाला भेटायला जाऊ लागला. तिही त्याची आतुरतेने वाट पाहू लागली. दिवसाही एकटी राहायला तयार नसणारी नभा आता रात्री आपल्या खोलीत एकटी झोपण्याचा हट्ट करू लागल्यामुळे तिच्या आईचा संशय वाढू लागला. एके रात्री नभा आणि आकाशचा आत्मा तिच्या खोलीत बोलत असताना नभाच्या आईने त्यांचा आवाज ऐकला. तो आवाज आकाशचाच असल्याची खात्री केली. तिला वाटले आकाश नभाला भेटण्यासाठी चोरून घरात शिरला आहे. तिने त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी दरवाजा जोराने ठोठावला व नभाला हाका मारू लागली.

तिच्या आवाजाने घरातले सगळेच उठले आणि कसला गोंधळ म्हणुन पाहायला आले. नभाची आई दरवाजावर थापा मारतच होती. नभा कमालीची घाबरली पण आकाशच्या आत्म्याने तिला धीर दिला. तो कोणालाही दिसणार नाही असा विश्वास दिल्यावर नभाने झोपेत व्यत्यय आल्याचा अभिनय करत दरवाजा उघडला त्यासरशी तिची आई तिरासारखी आत शिरली. “कुठाय तो नालायक? रात्री अपरात्री एका परपुरुषाला आपल्या घरात घेताना तुला लाज कशी नाही वाटली? कुठे लपवून ठेवला आहेस त्याला? एवढी लाज सोडलीस? बोल पटकन कुठाय आकाश?” नभाची आई रागाने थरथरत होती.

[next] नभा आश्चर्य झाल्यासारखे दाखवत म्हणाली, “अगं तू काय बोलतेस ते तुझे तुला तरी कळतंय का? आकाश कुठून येईल इकडे? तुला स्वप्नात पण तो दिसू लागला की काय?” त्यावर तिची आई आणखीन भडकली. “जास्त शहाणपणा करू नकोस हा नभा! तू आकाशशी बोलत असताना मी माझ्या कानांनी ऐकलंय. तो नक्कीच इथे आला होता. मी दरवाजा वाजवल्यामुळे त्याला पळून जायला चान्स मिळाला असणार.” तिने आपली शंका मांडली.

“हो का? या खोलीला हा एकच दरवाजा आहे आणि या दोन खिडक्या, त्यांनाही लोखंडी गज आहेत. आकाश इथे आत कसा काय येऊ शकतो आणि आता काय अदृश्य झाला का हवेत? तुला झोपेची खुप गरज आहे असे दिसतंय. भास होऊ लागलेत तुला? जा जाऊन झोप आणि इतरांना पण झोपू दे.” नभा आता वैतागली होती. “पण मी माझ्या कानांनी ऐकलंय दोघांना बोलताना.” नभाची आई पुरती गोंधळली होती.

तेव्हा नभाचे वडील मध्ये पडले. “अगं काय चालवलंयस तू? नक्कीच तुला स्वप्न पडले असेल किंवा भास झाला असेल. चल बघू झोपायला!” असे म्हणुन ते जवळ जवळ ओढतच तिला बाहेर घेऊन गेले. नभाची आई स्वतःशीच बोलत होती, “मी स्पष्ट ऐकले दोघांना बोलताना, अचानक आकाश गेला कुठे? रवीच्या कानावर उद्या हा विषय घालायलाच पाहिजे.” इकडे नभा आणि आकाशच्या आत्म्याला नभाच्या आईची अवस्था पाहून आपले हसू आवरत नव्हते. थोडा वेळ गेल्यावर जेव्हा ते नॉर्मल झाले तेव्हा आकाशचा आत्मा दबक्या आवाजात म्हणाला, “आता आपल्याला आणखीन सावध राहायला पाहिजे, तुझी आई याच्या मुळाशी गेल्याशिवाय गप्प बसण्यातली नाही.”

[next] “मी आता निघतो. तिकडे माझ्या घरच्यांना संशय यायला नको.” नभाला गुडनाईट किस देत तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी नभा ऑफिसला गेल्यावर लगेचच तिच्या आईने आपल्या भावाला फोन लावला व सगळा प्रकार कानावर घातला. त्यालाही आश्चर्य वाटले पण कदाचीत आपल्या बहिणीला भास झाला असावा किंवा आकाश खिडकीच्या बाहेरून बोलत असावा आणि तिने दरवाजा वाजवताच तो अंधारात गायब झाला असावा असा विचार मांडला. पण नभाची आई आपल्या शब्दावर ठाम होती. तेव्हा त्याने तिला बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगून आपण लवकरच येत असल्याचे कळवले.

परीक्षेचा रिझल्ट लागला आणि ऑफिसमध्ये आकाश आला तो पेढे घेऊनच. शेवटी एकदाचा तो ५६% मिळवून पास झाला होता. सुटलो बुवा एकदाचा! ग्रॅज्युएशनचा टिळा लागला. आता यापुढे शिक्षणापासून दहा हात लांब राहायचे असे त्याने ठरवले. त्याच्या वडीलांनी जागा घेऊन त्यात आंबा काजुची कलमे आणि सोबत नारळ पोफळीची रोपे लावली होती. नोकरी सांभाळून त्यांना त्याच्याकडे लक्ष घालायला जमत नसल्याने फारसे उत्पन्न मिळत नव्हते. आकाशने त्यातच लक्ष घालून चांगले पैसे कमवायचे ठरवले. आपला विचार त्याने नभाला सांगितला तेव्हा तिने त्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

आकाशच्या आईला त्याचा निर्णय पसंत नव्हता पण शेवटी पैसेच तर कमवायचे आहेत! ते नोकरी करून कमवा किंवा बिझनेस करून, काय फरक पडतो? प्रत्येकाने डॉक्टर-इंजिनियरच व्हायला पाहिजे असे थोडे ना आहे? ही आकाशची फिलॉसॉफी तिला पटली. त्याची शैक्षणिक प्रगती पाहता त्याने पुढे शिकावे हा हट्ट तिने सोडून दिला. धाकटा भाऊ अभ्यासात हुशार असल्याने त्याची तशीही काळजी नव्हतीच. वडीलांनीही आकाशच्या निर्णयाचे स्वागतच केले. मग काय, लगेचच आकाशने आपली नोकरी सोडली आणि रोज सकाळी जिममध्ये आणि दिवसभर आपल्या बागेत घाम गाळू लागला.

[next] दररोज संध्याकाळी न चुकता तो आपली साधना करत असे आणि जोशी काकांकडे जाऊन आपल्या ज्ञानात भर पाडत असे. आकाशने नोकरी सोडल्याचे कळताच नभाच्या आईला खुप आनंद झाला आता तो नभाला रोज भेटणार नाही असे तिला वाटले. पण आकाश जेव्हा काम करून थकल्यावर आपल्या शेतघरामध्ये आराम करत असे, त्याचा आत्मा क्षणात नभाच्या जवळ जात असे. तो नभाच्या गालाचे अलगद चुंबन घेऊन आपल्या आगमनाची तिला जाणीव करून देत असे.

मग ती काही बहाण्याने वॉशरूममध्ये किंवा बुक स्टोअररूम मध्ये जाऊन आकाशच्या आत्म्याशी हळू आवाजात बोलत असे. एरव्ही पाचच मिनिटात वॉशरूम मधून परतणारी नभा आता अर्धा अर्धा तास घेऊ लागल्याचे रसिकाच्या लक्षात आले. तिने तिला काळजीने विचारलेही की काही प्रॉब्लेम आहे का म्हणुन पण नभाने काही नाही म्हणुन वेळ मारून नेली. स्टोर रूम मधेही नभा कोणाशी तरी बोलत असल्यासारखे रसिकाला अनेकदा जाणवले तिने आत डोकावले असता कोणीही दिसले नाही. तिने नभाकडून जाणून घ्यायचा प्रयत्न केला पण नभाने ताकास तूर लागू दिला नाही.

हळू हळू आकाशची साधना वरच्या स्तराला पोहोचली व आता त्याचा आत्मा दृश्य स्वरूपात नभासमोर येऊ शकत होता. नभाला याचा खुप आनंद झाला कारण ती तिच्या प्राणाहून प्रिय असलेल्या आकाशला आता केवळ ऐकूच नव्हे तर पाहू पण शकत होती. जगापासून दूर ते दोघे आपल्याच विश्वात तासंतास हरवलेले असायचे. रात्री एकमेकांशी बोलत बसायचे. आपल्या भावी आयुष्याचे सुंदर स्वप्न रंगवायचे. त्यांना कल्पनाही नव्हती की नियती त्यांच्यासाठी काहीतरी वेगेळेच प्लॅन करत होती. आत्तापर्यंत आलेल्या अडचणी या तर फक्त ट्रेलर होत्या, खरा सिनेमा तर आता सुरु होणार होता.

[next] राकेशची तब्येत एव्हाना सुधारली होती आणि त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज पण मिळाला होता. त्याला त्याच्या मित्रांकडून आकाशचे नभा नावाच्या मुलीशी प्रेम जुळल्याचे कळले होते. आकाशला कसे गोत्यात आणायचे याचाच तो दिवसरात्र विचार करत असे. एकदा समुद्रावर तो मित्रांसोबत बसलेला असताना त्याला त्याची मैत्रीण पूजा दिसली आणि त्याच्या कुटील डोक्यात एक डाव शिजला. त्याने तिला हाक मारली तशी ती मैत्रिणींना पुढे जायला सांगून त्याच्याकडे गेली. तोही त्याच्या मित्रांपासून थोडा दूर जाऊन तिच्याशी बोलू लागला.

“कशी आहेस? आणि आहेस कुठे सध्या? परीक्षा झाल्यापासून गायबच आहेस.” “अरे सुट्टी होती ना, म्हणुन आजी आजोबांकडे गावी गेले होते. रिझल्ट लागला तसे आले परत. तू सांग तुला किती पर्सेंट मिळाले?” पूजाच्या या प्रश्नावर राकेशचा चेहरा पडला. “कसले पर्सेंट? नापास झालोय परत! तो आकाश मात्र पास झाला.” तो उदास स्वरात म्हणाला. स्वतःच्या नापास होण्यापेक्षा आकाशच्या पास होण्याचे त्याला जास्त दुःख झाले होते. “अरे हा! आकाश वरून आठवले, रश्मी कशी आहे?”

“काय सॉलिड ठासली होती ना आपण त्या आकाशची!” असे म्हणुन पूजा हसू लागली पण राकेशचे तोंड पडलेले पाहून तिने आपले हसू आवरते घेतले. “काय रे काय झाले? सगळे ठीक तर आहे ना? रश्मीशी भांडलास की काय?” तिने काळजीने विचारले. त्यावर राकेश उसळून म्हणाला, “नांव काढू नकोस तिचे. त्या आकाश पासून तिला दूर केले पण शेवटी त्याच्याचकडे गेली ती! मला डिच केले तिने.” “काय सांगतोस काय? हे सगळे मला नवीन आहे. तू काही सांगितलेस का नाही?” पूजाला धक्काच बसला होता.

[next] “सांगायला तू इथे होतीस तरी का?” राकेशचा चिडका स्वर तिला सांगून गेला की त्याच्या मनात बराच काही खदखदतंय. आवाज शक्य तेवढा नॉर्मल ठेवत ती म्हणाली, “अरे हो, ते ही खरंच. बरं मला जरा शांतपणे सांगशील का? काय झाले ते? आपण काही तरी मार्ग काढू. डोन्ट वरी. रश्मी परत तुझ्याचकडे येईल.” “मला तिची गरज नाही, मला फक्त तिचा आणि त्या आकाशचा बदला घ्यायचा आहे.” राकेश उत्तरला. “बरं, मी इथे नसताना काय झाले ते सांगतोस का? की मी जाऊ?” पूजा आता वैतागली होती.

राकेशला पूजाची खूप मदत लागणार होती त्यामुळे त्याने तिला आकाश आणि नभाबद्दल सांगितले. आकाशने त्याची आणि त्याच्या मित्रांची एकट्याने धुलाई केल्याचे न सांगता आकाशने चार पाच जणांना सोबत आणून आपल्याला मारल्याचे त्याने पूजाला सांगितले. पूजाने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ती त्याला म्हणाली, “असं आहे तर सगळे! बोल माझी काय मदत हवी आहे तुला?” राकेशने आपली पहिली चाल खेळली. तो तिला म्हणाला, “तुझा पुढे काय करायचा विचार आहे? म्हणजे जॉब वगैरे?” “सध्या तरी काही नाही. मला एम.एस.सी करण्यांत काहीच इंटरेस्ट नाही.”

“तसेही माझा बॉय फ्रेंड मुंबईत एम.एन.सी कंपनीत मजबूत कमावतोय. मी मागेन तेव्हा आणि मागेन तितके पैसे माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करतो. त्यामुळे मी मस्त पैकी शॉपिंग, हॉटेलिंग आणि फ्रेंड्स सोबत हँग आऊट करणार आहे. तसेही सहा एक महिन्यात माझे त्याच्याशी लग्न होईल मग मी त्याच्या पैशांवर फक्त ऐश करणार आहे.” पूजा स्वप्नांचे इमले बांधत म्हणाली. “ओके, तू जसा प्लॅन केला आहेस तसेच कर. फक्त काही दिवसांसाठी तू त्या नभाच्या ऑफिसमध्ये जॉब करायचा आणि मला त्या दोघांबद्दल जी काही माहिती मिळेल ती पुरवायची.”

[next] “माझे काम झाले की तू लगेच जॉब सोडलास तरी चालेल. करशील एवढे माझ्यासाठी?” राकेशने पूजाच्या डोळ्यात रोखून बघत विचारले. “मला जॉब वगैरे करायची इच्छा नाही पण थोड्याच दिवसांचा प्रश्न असेल तर मी करेन. पण त्यांच्याकडे ओपनिंग आहे का? पूजाने तोंड वाकडे करत विचारले. "ती माहिती मी काढली आहे. त्यांना आता एका रिसेप्शनिस्टची गरज आहे तू उद्याच तिथे जा आणि कामाला लाग.” राकेश उत्साहाने म्हणाला. “ठीक आहे तुझ्यासाठी म्हणुन करते पण मी जास्त दिवस तिथे नाही थांबणार आधीच सांगते.” पूजा तोऱ्यात म्हणाली.

दुसऱ्या दिवशी पूजा त्या ऑफिसमध्ये गेली. नभा आणि सरांनी तिचा इंटरव्ह्यु घेतला. नभाने ओके म्हटल्यावर सरांनी पूजाला रिसेप्शनिस्टच्या पोस्टवर अपॉईंट केले. नभा पूजाला ओळखत नसल्याने तिच्यावर तिला काहीच संशय आला नाही. तिने पूजाला तिचे काम समजावून सांगितले. इन्क्वायरी आल्यावर काय आणि कसे बोलायचे ते शिकवले. तिच्याकडून दोन तीन दिवस प्रॅक्टिस करून घेतली. ती व्यवस्थित काम करू शकते याचा विश्वास वाटल्यावर नभाने ते काम तिच्यावर सोपवून आपल्या कामात लक्ष घालायला सुरवात केली.

नवीन असल्यामुळे नभा पूजाला सर्व प्रकारे सहकार्य करू लागली. जेवायला पण दोघी एकत्रच बसू लागल्या. पूजाने बोलण्या बोलण्यातून नभाकडून काही माहिती मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न केला पण नभाने तिला ऑफिस मधील कामाव्यतिरिक्त वैयक्तिक अशी कोणतीही माहिती पुरवली नाही. नभाला आपल्या जाळ्यात अडकवणे तेवढे सोपे नाही हे पूजा समजून चुकली होती पण तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले.

[next] आकाश आंबा काजू लागवड आणि जोपासनेच्या कार्यशाळेसाठी बाहेरगावी गेलेला असल्यामुळे नभाला भेटायला ऑफिसला येऊ शकला नाही पण रात्री नभाच्या घरी तो गुपचूप येत असे. आठवडा होऊनही नभाकडून आकाशबद्दल काहीच माहिती मिळत नाही हे लक्षात आल्यावर पूजाचे पेशन्स सुटू लागले होते. एके दिवशी दुपारी आकाश कार्यशाळा संपल्यावर नभाला भेटायला अदृश्य रूपात ऑफिसला आला, नेमकी त्यावेळी पूजा वॉशरूमला गेली होती त्यामुळे त्याला ती दिसली नाही.

सर्व एजंट्स कॉलवर गेले होते आणि रसिका व इतर मुली लंचसाठी बाहेर गेल्या होत्या. नभा ऑफिस मध्ये एकटीच असल्यामुळे आकाश तिच्या समोर दृश्य रूपात आला. तो दृश्य व्हायला आणि पूजा वॉशरूम मधून परतायला एकच गाठ पडली. अचानक आकाश प्रकट झाल्यामुळे ती एकदम गडबडली आणि दरवाजातच थबकली. आकाश आणि नभाचे तिच्याकडे लक्ष जाण्याआधीच ती मागे सरकली. खिडकीच्या झडपेच्या आडून ती आत पाहू लागली.

आकाशला अचानक असे दृश्य स्वरूपात आलेले पाहून नभा सुद्धा दचकली आणि घाबरली सुद्धा. “आकाश काय हा मुर्खपणा? असे अचानक समोर येत नको जाऊस, मी किती घाबरले माहित आहे? तू वाटल्यास दृश्य रूप घेऊन ये पण असे करू नकोस. चुकून तुला असे आकाशातून टपकल्यासारखे कोणी पहिले तर मोठी विचित्र परिस्थिती होईल.” नभा वैतागून म्हणाली. “अगं! एक तर मी तुला भेटायला अलोय आणि तू माझ्यावर चिडतेस काय? तुला ना माझी कदरच नाही.”

[next] “केवळ तुझ्यासाठी मी एवढी कठीण विद्या शिकलोय. माझे शरीर तिकडे माझ्या शेतघरात असुरक्षित सोडून मी एवढ्या लांबून तुला सूक्ष्म रूपात भेटायला आलोय त्याचे तुला काहीच नाही.” आकाश दुखावला गेला होता. “हो रे माझ्या सोन्या, तू माझ्यासाठी काय काय करतोयस ते मला सगळे माहित आहे. पण मी केवळ खबरदारी म्हणुन म्हणाले. कोणाला आपले सिक्रेट कळले आणि त्यांनी ते माझ्या घरी सांगितले की मग संपले सगळे. माझी आई आणि मामा काय करतील हे तुला चांगले ठाऊक आहे ना?” नभा समजावणीच्या सुरत म्हणाली.

“हो तुझे बरोबर आहे पण आत्ता ऑफिसमध्ये कोणी नाही म्हणुनच मी असा तुझ्या समोर प्रकट झालो नाहीतर असे केले नसते. मला पण डोकं आहे मॅडम” आकाश तिला चिडवत म्हणाला. “तुझ्या सारखा माणूस कुठे शोधूनही सापडणार नाही हे मी जाणते माझ्या राजा, मी खरंच भाग्यवान आहे जे तू माझ्या आयुष्यात आलास! पण ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी जॉईन झाली आहे. ती वॉशरूमला गेली आहे, आणि आत्ता कोणत्याही क्षणी परत येईल म्हणुन मी एवढी काजळी करतेय.”

“मला पण तुझ्या मिठीत शिरावेसे वाटत आहे पण उगाच रिस्क नको. तू नेहेमी सारखा सगळे झोपल्यावर रात्री ये ना घरी, मग मी माझ्या वेडोबाचा रुसवा काढते. पण तू आता मात्र जा.” नभा समजावणीच्या सुरात म्हणाली. आकाश हिरमुसला होता पण त्याला नभाचे म्हणणे पटले “ठीक आहे वेडाबाई, जशी आपली आज्ञा!” असे म्हणुन आकाशने नभाचे एक अलगद चुंबन घेतले आणि क्षणात तिथून गायब झाला.

[next] पूजा डोळे विस्फारून तो प्रकार पाहत होती. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ती स्वतःशीच बोलू लागली, “हे कसे काय होऊ शकते? आकाशला अशी कोणती विद्या प्राप्त झाली आहे की तो चक्क आपले शरीर एका जागेवर सोडून आपल्याला हवे तिथे सूक्ष्म स्वरूपात जाऊ शकतो. ही तर ब्रेकिंग न्यूज आहे. राकेशला सांगितले तर तो वेडाच होऊन जाईल. आकाशला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून ही विद्या शिकता आली तर आपण काय वाटेल ते करू शकतो.”

कधी एकदा हे सर्व राकेशला सांगते असे तिला झाले होते. ती ऑफिस मध्ये आली तेच आपले डोके धरून. तिला कण्हताना पाहून नभाने तिची काळजीने विचारपूस केली. डोके खुप ठणकत असल्याचे सांगून तिने हाफ डे टाकला व ऑफिस मधुन बाहेर पडली. तिने राकेशला फोन लावला व अर्जंट भेटायला बोलावले. तो लगेच आपल्या बाईकवर तिथे आला. त्याच्या मागे बाईकवर बसत तिने गाडी थिबा पॉईंटकडे घेण्यास सांगितले. तिथे पोहोचल्यावर तिने पाहिलेला सगळा प्रसंग त्याला रंगवून सांगायला सुरवात केली.

तिचे बोलणे ऐकत असताना राकेशच्या चेहऱ्यावरचे भाव पटापट बदलू लागले. पूजाच्या सांगण्यावर विश्वास ठेवणे त्याला आधी खुप जड गेले पण ती त्याच्याशी खोटे बोलणार नाही याची त्याला खात्री होती. त्यामुळे त्याला तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे भाग होते. आकाशला कायमचा संपवायचा उपाय त्याला सापडल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर असुरी आनंद पसरला. त्याने पूजाला या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नकोस असे बजावले. त्याने तिच्याकडून नभाच्या घरचा नंबर मिळवला आणि एस.टी.डी बूथ वरून फोन लावला.

[next] “नभाच्या आई बोलताय का? मी नभाचा मित्र बोलतोय. मला तुम्हाला नभाबद्दल काही सांगायचंय. ती तुम्हाला फसवतेय. कसे ते मी तुम्हाला फोनवर नाही सांगू शकणार. मला तुमचा पत्ता द्या मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटून काय ते सांगतो. ओके, ओके, ओके, ठीक आहे. मला पत्ता समजला, मी अर्ध्या तासात तुमच्याकडे पोहोचतो पण मी तुम्हाला हे सर्व काही सांगितलंय हे तुम्ही नभाला कळू देणार नाही असे वचन द्या. ओके मग भेटूया अर्ध्या तासात.” एवढे बोलून राकेशने फोन ठेवला.

त्याच्या चेहऱ्यावर कुटील हास्य पसरले होते. “चल बस गाडीवर, त्या आकाशला पोहोचवायची तयारी करूया.” राकेश बाईकला किक मारत पूजाला म्हणाला. “राकेश, तू तुला काय करायचे ते कर पण मला यात अडकवू नकोस. मी तुझे काम केले, आता मला मोकळे कर. उद्या काही लोच्या झाला तर निस्तरताना आपल्या नाकी नऊ येतील.” पूजा राकेशला म्हणाली. राकेशच्या डोक्यात सणक गेली पण त्याने आपला राग आवरला व पूजाला म्हणाला, “कमॉन यार. एवढी काय घाबरतेस? तुला काही प्रॉब्लेम होणार नाही याची गॅरंटी मी घेतो. तू फक्त माझ्या सोबत यायचंस, कारण तू आल्यामुळे नभाच्या आईला सगळे पटवून देणे सोपे होईल.”

“अरे पण मी नभा सोबत काम करत असल्यामुळे नभाला समजेल ना, की या सगळ्याला मी कारणीभूत आहे ते?” पूजाने आपली शंका मांडली. “तू त्याची काळजी करू नकोस. तसेही तुला तिथे कायमस्वरुपी जॉब करायचा नाही आहे आणि नभाला कळले तरी ती तुझे काहीच वाकडे करू शकत नाही. त्यामुळे फालतू एस्क्युज देणे बंद कर आणि माझ्या सोबत चल. नंतर तुला मी घरी सोडेन. सो डोन्ट वरी अँड सीट ऑन माय बाईक.” राकेशच्या आवाजातील जरब पूजाला जाणवली. नाईलाजाने ती राकेशच्या मागे बाईकवर बसली.

[next] खरेतर तिला या नसत्या भानगडीत पडायचे नव्हते, पण तिची इच्छा असो वा नसो तिला या कारस्थानात सहभागी होणे भाग होते. आकाशला रश्मी पासून दूर करणे वेगळे आणि त्याच्या जीवाला काही बरेवाईट करणे वेगळे. पूजाचे हृदय पुढे काय होणार या विचाराने वेगाने धडधडत होते. ती आपल्याच विचारात हरवली असताना राकेशची बाईक नभाच्या घराच्या दिशेने धावत होती. आपण अडकत चालल्याची जाणीव पूजाला झाली होती. तिला आपल्या सेफ्टीची काळजी वाटू लागली. उद्या काही गडबड झालीच तर त्यातून वाचण्यासाठी आपल्याजवळ ठोस पुरावा असला पाहिजे असा विचार तिच्या मनात आला आणि तिचा हात आपसूकच आपल्या मोबाईल कडे गेला.

बिचाऱ्या नभा आणि आकाशला आपल्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय याची पुसटशी कल्पनाही नव्हती. आकाशचे दुर्दैव एवढे जोरावर होते की त्या दिवशी सकाळीच नभाचे चारही कर्दनकाळ मामा नभाच्या घरी आले होते. नभाला ते आल्याची कल्पनाही दिली गेली नव्हती. नभाचे मामा आले तेव्हा तिचे वडील त्यांच्या मित्राकडे गेले असल्यामुळे त्यांना सुद्धा आपले मेव्हणे आल्याचे माहित नव्हते नाहीतर त्यांनी नभाला याची कल्पना दिली असती. एकंदरीत नशीब पण नभाच्या विरोधात होते. राकेश जेव्हा पूजा सोबत नभाच्या घरी पोहोचला तेव्हा ते चारही जण त्याचीच वाट पाहत बसले होते. नभाच्या आईने त्यांना सर्व कल्पना दिली होती. राकेशच्या तोंडून सर्वकाही ऐकण्यास ते आतुर झाले होते.

क्रमशः


केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,2,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1347,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,3,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1087,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,5,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,14,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,25,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,220,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,13,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,69,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,11,निवडक,7,निसर्ग कविता,33,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,36,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,3,पुडिंग,10,पुणे,13,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,10,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,8,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,18,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1130,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,27,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,47,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,286,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,147,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,304,महाराष्ट्र फोटो,10,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,55,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,7,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,112,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,2,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: जातबळी भाग ५ - मराठी भयकथा
जातबळी भाग ५ - मराठी भयकथा
जातबळी भाग ५, मराठी कथा - [Jaatbali Part 5, Marathi Katha] आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpEWUg-GOy55lveEMxlt47pQnA8E_fD1FluZcM5Afg0Tdmb9J_JDWZLuqxYvQZnRmQG1WY4NLcU09ReN4Z3nwDQ_JLoo7DcE91vfBygY8QHk0HppSnZ1JkT5Ipin9ygNtvoo2UMRG9ow8a/s1600/jaatbali-part-5-marathi-katha.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpEWUg-GOy55lveEMxlt47pQnA8E_fD1FluZcM5Afg0Tdmb9J_JDWZLuqxYvQZnRmQG1WY4NLcU09ReN4Z3nwDQ_JLoo7DcE91vfBygY8QHk0HppSnZ1JkT5Ipin9ygNtvoo2UMRG9ow8a/s72-c/jaatbali-part-5-marathi-katha.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/07/jaatbali-part-5-marathi-katha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/07/jaatbali-part-5-marathi-katha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची