ये रे ये रे पावसा - मराठी कविता

ये रे ये रे पावसा, मराठी कविता - [Ye Re Ye Re Pavasa, Marathi Kavita] कोपलास का रे, तू माझ्यावरती.
ये रे ये रे पावसा - मराठी कविता | Ye Re Ye Re Pavasa - Marathi Kavita
कोपलास का रे
तू माझ्यावरती
कट्टी फु असते
तुझी मराठवाड्यावरती

रवी काका रागावून
जाळी आमची धरती
सांग वरून कधी
करशी प्रीत आम्हांवरती

तुझी काली आई
बघ हाक मारती
शपथ तुला लेकरा
सांडू नको रं नाती

लेक काळ्या मातीचा
प्राण डोळ्यात आणती
हट्ट सोड सख्या
ये रे पाहुणचारासाठी

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.