आलू मटार कटलेट - पाककृती

आलू मटार कटलेटची पाककृती, पाककला - [Recipe of Aaloo Mutter Cutlet, Recipes] आलू मटार कटलेट हा चवीला वेगळा आणि घरीच बनवता येणारा चटपटीत पदार्थ.
आलू मटार कटलेट - पाककृती | Aaloo Mutter Cutlet - Recipe

चवीला कुरकुरीत, खमंग आणि घरीच बनवता येणारा एक चटपटीत पदार्थ जो लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच न्याहारीत किंवा मधल्या वेळेत करून खाता येईल

‘आलू मटार कटलेट’साठी लागणारा जिन्नस


 • ४-५ उकळलेले बटाटे
 • १ कप उकडलेली मटार
 • कापलेली कोथिंबीर
 • कापलेली हिरवी मिरची
 • १ चमचे मीठ
 • १/२ चमचा धणे
 • १/२ चमचे मिरची
 • १ चमचे अरारोट

‘आलू मटार कटलेट’ची पाककृती


 • पहिले उकडलेल्या बटाट्यास आणि उकडलेली मटार बरोबर मिळवावे.
 • सुके मसाले, हिरवी मिरची व कोथिंबीर टाकुन चांगल्या तर्‍हेने मिळवावे. आता गोल किंवा अंडाकार बनवुन कढईत तूप किंवा तेलात तळावे.
 • हिरवी मिरची किंवा टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम खावे.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.