कांदा लसूण मसाला (पाककृती)

कांदा लसूण मसाल्याची पाककृती - [Kanda Lasun Masala Recipe] अस्सल महाराष्ट्रीयन कांदा लसूण मसाला उसळ, वरण आणि मसाले भात सारख्या व्यंजनांत वापरला जातो.
कांदा लसूण मसाल्याची पाककृती | Kanda Lasun Masala Recipe
कांदा लसूण मसाला (पाककृती), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
कांदा लसूण मसाल्याची पाककृती - (Kanda Lasun Masala Recipe) पाककृती अस्सल महाराष्ट्रीयन कांदा लसूण मसाला उसळ, वरण आणि मसाले भात सारख्या व्यंजनांत वापरल्यास व्यंजनांना अधिक खमंग चव येते.

कांदा लसूण मसाला करण्यासाठी लागणारा जिन्नस

 • २ - ३ कांदे
 • १५ - २० पाकळ्या लसूण
 • १५० ग्रॅम धणे
 • १५० ग्रॅम सुक्या मिरच्या
 • २ - ३ दालचिनी
 • १ हळकुंड
 • १ टि. स्पून लवंग
 • १० - १२ तमालपत्रे
 • १० मसाला वेलदोडे
 • १ टि. स्पून काळे मिरे
 • ५ टि. स्पून जिरे
 • १ टि. स्पून शहाजिरे
 • १० ग्रॅम दगड फूल
 • ५ ग्रॅम बाद्यान (बदामफुले)
 • ५ ग्रॅम नागकेशर
 • १०० ग्रॅम खसखस
 • १०० ग्रॅम तीळ

कांदा लसूण मसाला करण्याची पाककृती

 • प्रथम वरील सर्व साहित्य निवडून स्वच्छ करुन घ्या.
 • नंतर सर्व साहित्य थोडया तेलावर वेगवेगळे भाजून घ्या.
 • भाजून झाल्यावर बाजूला गार करायला ठेवा.
 • गार झाल्यावर मिक्सरमध्ये एकत्र करून बारीक करा.
 • तयार कांदा लसूण मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.
हेमा चिटगोपकर
सभासद, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
पाककला या विभागात लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.