कोकणी मसाला - पाककृती
कोकणी मसाल्याची पाककृती - [Konkani Masala Recipe] महाराष्ट्रातील सर्वाधिक निसर्ग संपन्न अशा कोकणातील ‘कोकणी मसाला’ हा विश्वविख्यात आहेच शिवाय काही प्रमुख भारतीय मसाल्यांतील हा एक लोकप्रिय चवीचा मसाला म्हणूनही ओळखला जातो. कोकणी मसाला हा शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोनही प्रकारच्या व्यंजनांसाठी वापरला जातो.
शाकाहारी आणि विशेष करून मांसाहारी व्यंजनांमध्ये कोकणी मसाला वापरल्यास व्यंजनांस रंग आणि चव दोन्ही उत्तम येतात
‘कोकणी मसाला’साठी लागणारा जिन्नस
- १/४ किलो सुक्या लाल मिरच्या
- १/४ किलो धणे
- १० ग्रॅम लवंग
- १० ग्रॅम जीरे
- १० ग्रॅम काळे मिरे
- १० ग्रॅम मोहरी
- १० ग्रॅम दलचिनी
- १० ग्रॅम जायपत्री
- १० ग्रॅम शहाजिरे
- १० ग्रॅम मेथीदाणे
- अर्धा वाटी खसखस
- १/२ जायफळ
- २५ ग्रॅम बडीशेप
‘कोकणी मसाला’ची पाककृती
- प्रथम वरील सर्व साहित्य निवडून घ्या.
- सर्व साहित्य कोरडेच भाजून घ्या.
- भाजून झाल्यावर बाजूला थंड करायला ठेवा.
- थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पूड करुन घ्या.
- तयार कोकणी मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.