आळशी तरुण मनुष्य - इसापनीती कथा

आळशी तरुण मनुष्य, इसापनीती कथा - [Aalashi Tarun Manushya, Isapniti Katha/Isapniti Story] आळशी तरुण माणसाची गोष्ट.
आळशी तरुण  मनुष्य - इसापनीती कथा

आळशी तरुण माणसाची गोष्ट

एका आळशी तरुण मनुष्यास सकाळी दहा वाजेपर्यंत बिछान्यातच झोपून राहण्याची सवय होती. एकदा त्याला कुणीतरी विचारले, ‘अरे बाबा, तू सकाळी लवकर का उठत नाहीस?’ त्यावर तो आळशी तरुण सांगतो, ‘प्रत्येक दिवशी सकाळी आलस्य आणि उदयोगिता या नावाच्या दोन स्त्रिया माझ्या दोन बाजूस उभ्या असतात.

उदयोगिता मला म्हणते की, अरे बाबा, आता लवकर ऊठ आणि तुझ्या कामाला लाग.’ आलस्य म्हणते की, ‘अजीबात उठू नकोस, असाच पडून रहा!’ इतकेच सांगून त्या थांबत नाहीत, तर आपापल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मोठ्ठी मोठ्ठी भाषणे करतात व निरनिराळी कारणे सांगू लागतात. दोघींचीही भाषणे, एखादया निष्पक्षपाती न्यायाधीशाप्रमाणे मी ऐकून घेतो तोच जेवणाची वेळ होते व मग त्या वेळी मी उठतो.

तात्पर्य: आळशी माणूस हा काम कारायला लागू नये; म्हणून हवी ती कारणे सांगत असतो.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.