माझी मराठी मातृभाषा, मराठी लेख - [Majhi Marathi Matrubhasha, Marathi Article] लहान मुलं जन्मल्यापासून आईजवळच असते. तेव्हा ती ज्या भाषेत बोलते ती मुलाची भाषा होणे स्वाभाविक आहे.
खेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते
मराठी भाषा आमुची मायबोली - म्हणजे मातृभाषा. लहान मुलं जन्मल्यापासून आईजवळच असते. तेव्हा ती ज्या भाषेत बोलते ती मुलाची भाषा होणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषा प्रत्येक प्रांताची निराळी. ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते. आपली मराठी भाषा संस्कृत भाषेतून आली. तशा भारतातल्या बहुतेक सर्व भाषा संस्कृत भाषेपासून निर्माण झाल्या. आपली मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी तिच दर बारा कोसावर बदलते. लेखी भाषा तीच असली तरी बोलीभाषेत फरक होतात. तिचे हेल वेगळे होतात. मराठी भाषेतसुद्धा असे वेगळे प्रकार होतात. कोकणातली कोकणी, घाटावरची म्हणजे देशावरची वेगळी, घाटी भाषा वेगळी, वऱ्हाडी भाषा वेगळी मध्यप्रांतांतली, मध्यप्रदेशातही हिंदी मिश्रित आणि गोव्याकडील कोकणी वेगळी असते.मराठी भाषा लवचिक आहे थोड्या थोड्या फरकाने शब्दाचे अर्थ बदलतात. मुंबईची मराठी भाषा हल्ली खिचडी भाषा झाली आहे. शुद्ध मराठी राहिली नाही. तिच्यात हिंदी, मराठी, इंग्रजी यांची भेसळ झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी सिनेमा पाहून भाषा अशी झाली आहे. पूर्वी मराठीला राजभाषेचा मान नव्हता, पण आता काही प्रमाणात आहे.
खेड्यापाड्यातली रांगडी आणि अशुद्ध, अपभ्रंश असलेली भाषा असते. कशीही असो ति मराठीच म्हणून मराठी माणसाला आवडते.
आपल्या भाषेचा आपल्याला आभिमान असतो. पण अलिकडे आपल्या तरुण मंडळीला इंग्रजी भाषेचे जास्त आकर्षण! त्यात त्यांचा दोष नाही. कारण त्यांचं महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण सर्व इंग्रजीतून होत असतं. पदव्या मिळवून तरुन मंडळी परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. तिथे इंग्रजी भाषाच बोलावी, लिहावी लागते.
[next] साहजिकच त्या भाषेचे संस्कार घडत असतात. त्या विकसित देशात आपल्या लोकांना द्रव्यप्राप्ती भारतातील लोकांपेक्षा जास्त प्रमाणात होते. त्यामुळे त्यांना तिकडेच रहाणे सुखाचे होते. त्यांचे संसार तिथेच होतात. त्यांच्या मुलांन मराठी येत नाही, ती तिथलीच होतात. सर्वचजण नाही पण काही तिथेच स्थायिक होतात. त्यामुळे त्या मुलांची ‘मायबोली’ तिकडची होते. हा विषय जरा वेगळा असला तरी मराठी भाषेवर, रहाणीवर, आचार विचारांव्र खूपच फरक होता. त्यांचं शिक्षणही तिकडेच होते. त्यामुळे मराठीचा त्यांना ग्रंथ, माहितीवार्ता नाही. संस्कारही तिथलेच, असे तिकडे राहिल्यामुळे होते. पण भारतात राहणाऱ्या तरुणांना आपल्य भाषेचा अभिमान नाही आणि त्यांना स्वतःच कौतुकही वाटते तेव्हा तुम्ही शिकून मोठे व्हा. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलत तरी हरकत नाही, पण काम झाल्यावर परत आपल्या भारतात या.
महाराष्ट्राला आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करुन द्या. परभाषा जरी अवगत झाली आणि परदेशात गेलात तरी आपल्या मराठीला विसरु नका. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा बोलता, लिहिता-वाचता आली पाहिजे.आपल्या मराठीतसुद्धा खूप विषयावर लेखन झाले आहे. शास्त्र-विज्ञान, ललित साहित्य खूप आहे. परदेशातून स्वदेशात येण्यासाठी ‘सागरा प्राण तळमळला’ म्हणणारे स्वातंत्रसूर्य सावरकरांची आठवण ठेवा.
मातृभाषेचा उदोउदो करा, महाराष्ट्राचा जयजयकार करा. एक व्हा संघटित व्हा.
- सुशीला मराठे
मराठी भाषे संदर्भातील एक अत्यंत उपयुक्त लेख, मराठीमाती डॉट कॉम चे धन्यवाद..
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाmarathi bhasheche jatan apanch karnyachi garaj ahe.marathimathi.com che dhanyawad
उत्तर द्याहटवाया निबंधामध्ये थोड्या चूका आहेत.पण निबंध छान.
उत्तर द्याहटवाविचार छान
उत्तर द्याहटवाkhupach chan aahe..Vachtanach marathi bhashe cha khup garv hot hota ani nehmi rahel...
उत्तर द्याहटवाkhupach chan aahe.vachtanach marathi bhashe cha khup garv hot hota ani nehmi rahel
उत्तर द्याहटवाkhupach Mast
उत्तर द्याहटवाकेवळ परदेशी जाणारेच नाही तर मराठी भाषेच्या होत असलेल्या ऱ्हासाला राजकीय मंडळी आणि इथले उच्च शिक्षित तेव्हढेच जबाबदार आहे.
उत्तर द्याहटवा