गश्मीर महाजनी घेऊन येतोय नवा शो

गश्मीर महाजनी घेऊन येतोय नवा शो, मराठी टिव्ही - [Gashmir Mahajani Introducing New Show, Marathi TV] - स्टार प्रवाहवर लवकरच येतोय नवा कार्यक्रम.
गश्मीर महाजनी घेऊन येतोय नवा शो

स्टार प्रवाहवर लवकरच येतोय नवा कार्यक्रम

मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम हंक म्हणून गश्मीर महाजनीचं नाव घेतलं जातं. आपल्या अभिनयानं मोठा पडदा व्यापल्यानंतर आता गश्मीर स्टार प्रवाहच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर एक अनोखा शो घेऊन येतोय. गश्मीरचं छोट्या पडद्यावरचं हे पदार्पण नक्कीच दिमाखदार असणार आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात अश्या पद्धतीने कोणत्याही कलाकाराचं पदार्पण आजवर झालेलं नाही.

गश्मीरनं आतापर्यंत अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता स्टार प्रवाह आणि गश्मीर महाजनी एकत्र येऊन एक नवा आणि वेगळा कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची सध्या मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत मोठी चर्चा आहे. आजवर मराठी टेलिव्हिजनवर कधीच न झालेला प्रयोग या नव्या कार्यक्रमातून केला जाणार आहे. त्यामुळे या नव्या कार्यक्रमाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्टार प्रवाहनं आजवर नेहमीच वेगळ्या मालिका, वेगळ्या कल्पना प्रेक्षकांपुढे आणल्या आहेत. नवा कार्यक्रमही त्याला अपवाद नाही. मात्र, हा कार्यक्रम नेमका काय आहे, गश्मीरचं त्यात काय योगदान आहे अशा सगळ्या प्रश्नांची लवकरच उत्तरं मिळणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.