Loading ...

वटपौर्णिमेच्या निमित्ताने - मराठी लेख

वटपौर्णिमेच्या निमित्ताने, मराठी लेख - [Vat Pournimechya Nimittane, Marathi Article] नात्याचा ओलावा आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे भान देणारा उत्सवरूपी सण म्हणजे वटपौर्णिमा.

वटपौर्णिमेच्या निमित्ताने - मराठी लेख | Vat Pournimechya Nimittane - Marathi Article

नात्याचा ओलावा आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे भान

प्रसिद्ध ज्येष्ठ पौर्णिमेतल्या सत्यवान सावित्रीची कथा आपल्या लहानपणापासून परिचयाची.

प्रत्येक सण म्हणजे भारतीय गृहिणीचा आनंदाचा झपुर्झा...

पहाटे सूर्याने डोकावले कि अंगणात सडा रांगोळीची हजेरी, घरातल्या आया बहिणींच्या बांगड्यांच्या मधुर नादाने घरातली बाकीची मंडळी साखरझोपेतून बाहेर येत, सकाळची ती गाणी नव्हे अमृतवाणी याचं वर्णन तरी काय करावे जणू ‘आनंदाचे डोही आनंद तरंग.’

आज हि गावाकडेच नाही तर शहरातल्या काही घरातदेखील सणावाराला वाडवडिलांच्या संस्कारामुळे हे सारं टिकलेले आहे.

भारतीय संस्कृतीतून जन्मलेले हे सण वार म्हणजे निखळ झराच.परंतु काही नवीन विचार प्रवाह यावर माती टाकायचं काम करत आहेत.

मूळ संस्कृतीवर धूळ साठल्याने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये सामान्य माणसाची थोडी गफलत होत आहे. आज पर्यंत आपण सण, संस्कृती, देव, यांवर चिकीत्सक प्रश्नांचा भडीमार अगदी क्वचित करायचो पण या नवीन पिढीला समजून सांगण्यात नाके नऊ येतात.

संस्कृती म्हणजे घरावरच कुंपण.
लग्न म्हणजे बंधन.
पण हि सत्व आणि तत्व ऐकण्यास नवीन पिढीचे मन आणि कान मिटलेले आहेत.

बंधने झुगारून मुक्तपणे वावरण्याकडे आजच्या पिढीचा कल दिसतो आहे. संस्कृतीचं कुंपण असण्याने आपण प्रत्यक्षात मुक्त, स्वैर वावरू शकतो. पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यामुळे आपली संस्कृती लुप्त होत चालली आहे. पैशासाठी धावायचे असेल तर पाश्चात्य अनुकरण ठीक आहे, पण सुखी व्हायचे असेल तर भारतीय संस्कृतीला पर्याय नाही.

सुख या संज्ञेखाली पैसा, आनंद, नाती, समाधान, सर्व काही येते. शिवाय हे सण आपल्या नात्यातला ओलावा पुनरुज्जित करतात, अंतरजालामुळे जग जवळ आले पण मने दुरावली; या “दुरावलेल्या मनांना जोडणारा दुवा म्हणजे हे सणवार...”

प्रत्येक नात्याची वीण घट्ट करण्यास जणू उभारली असेल सणांची मुहूर्तमेढ. आपण या सणांप्रती श्रद्धा ठेवून चाललो तर जगण्यातला आनंद द्विगुणित होईल. सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवले असे या पिढीस समजावले अगदीच भाकड कथा वैगेरे वाटेल, पण सावित्रीच्या दांडग्या इच्छाशक्तीची प्रचिती आजच्या युवा पिढीला करून देऊ, वटवृक्षातून उत्सर्जित होणारा ऑक्सिजन पती पत्नीला सदा एकत्र राहण्याची ऊर्जा देवो.

नोकरदार स्त्रियांना वडाला वेष्टन बांधणं जमेलच असे नाही, पण सणाविषयी आदर, श्रद्धा, नात्यात दोघांचंही समर्पण हवं.

स्वतंत्र आणि नवीन विचारमतवाद्यांना हे पण अपचनीय वाटले तर जोडीने एखादे वडाचे झाड लावले तर नातं आणि पर्यावरण दोन्ही फुलेल. पुढच्या दहा वीस वर्षात वटपौर्णिमेबद्दल बोलायचे झाले तर आधी ‘वटवृक्ष संवर्धन’ करावे लागेल. मला तर वाटत आपले पूर्वज खूप हुशार होते त्यांनीच वृक्ष लागवड, जतन आणि संवर्धन यासाठी हा सण काढून नात्याचं लेबल चिटकवले असेल. आज आपण सण-उत्सव याबद्दल उदासीन राहिलो तर कालांतराने सारे इतिहासजमा होईल. मग व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराची नांदी होईल. तेव्हा लग्न, संस्कार काळाच्या पडद्यामागे विरून जातील. आजची आपली पिढी सणाबाबत काहीशी उदासीन आहे.
उद्या ‘लग्नाचे बंधन’ नको वाटेल. शिवाय युवा पिढीतले काही मीडिया, टीव्ही, फॅशन, मॉडर्न लाईफ स्टाईल, मुळे आताच बिघडलेत म्हणायला हरकत नाही. वेळीच त्यांना संस्काराची फुंकर घालावयास हवी.

“काही वर्षांनी मंदिराऐवजी जागोजागी क्लब, थिएटर, बार बघायला मिळू नये म्हणजे मिळवले...”

असो,
नात्याचा ओलावा आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे भान आपल्या सर्वाना वटपौर्णिमेच्या निमित्ताने यावे एवढेच.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची