बाप्पा - मराठी कविता

बाप्पा, मराठी कविता - [Bappa, Marathi Kavita] गणपती हे गणराया, विघ्न दूर करीशी हे तुची नाथा.

गणपती हे गणराया, विघ्न दूर करीशी हे तुची नाथा

गणपती हे गणराया
विघ्न दूर करीशी हे तुची नाथा

अनाथांचा तूची आहेस वाली
दुःखी जनांना तुच देशी आधार
सुखाची तुच देशी झोळी भरभरून
महिमा तुझी आहे अपरंपार

सदा राहुदे भक्तांवर तुझ्या कृपेचा हात
गणपती हे गणराया आता
विघ्न दूर करीशी हे तुची नाथा

भक्त करिती तुझ्या नावाचा जागर
माणसा माणसामध्ये वाढलाय अहंम भाव
तुच त्यांना देऊनी बुद्धी
शिकवण देशी परोपकाराची

हिच विनवणी करितो
तुम्हा गणराया हात जोडूनी
आशिर्वाद असूदे या पामरांवरी

गणपती हे गणराया आता
विघ्न दूर करीशी हे तुची नाथा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.