सर्वत्र होते उधळण रंगाची फाल्गुन महिन्याची गोळी गुलाबी आली आली बघा थंडीत होळी मनाशी मन मिळवण्यासाठी मनातील द्वेष मिटविण्यासाठी थोडी तिखट उसळ चण्याची नंतर मिळते बघा पोळी पुरणाची दिवस दुसरा रंगत सणांची सर्वत्र होते उधळण रंगाची