एक प्रार्थना करूण रुदन, तिच्यातले मी जपतो मी पण
एक प्रार्थना करूण रुदनतिच्यातले मी जपतो मी पण
डोळ्यांवरती ऊन बिलोरे
डोळ्यांखाली ओले शिंपण
एक तमाचा प्राचीन धागा
गुंफत आहे नवीन तागा
श्वासांची जन्मांध वैखरी
अढळ आहे आपुल्या जागा
एक क्षणाच्या बुटक्या वेळी
उंच आशेच्या बसक्या भाळी
एक बीजाच्या कर्मकपाळी
मोहाच्या नक्षीची जाळी
एक घागर आहे पालथी
पृथ्वीच्या ह्या कवचावरती
आम्ही कोरडे जन्मोजन्मीचे
राहतो नेहमी नभा खालती