Loading ...

अक्काबाईची आराधना (चातुर्य कथा)

अक्काबाईची आराधना (चातुर्य कथा) - आराधना करून चतुर गरीब माणसाचे चातुर्य दाखवून देणारी चातुर्य कथा अक्काबाईची आराधना.

अक्काबाईची आराधना (चातुर्य कथा)

आराधना करून चतुर गरीब माणसाचे चातुर्य दाखवून देणारी चातुर्य कथा अक्काबाईची आराधना


अक्काबाईची आराधना (चातुर्य कथा) - आराधना करून चतुर गरीब माणसाचे चातुर्य दाखवून देणारी चातुर्य कथा अक्काबाईची आराधना.



एका गृहस्थाची परिस्थिती अगदीच बेताची होती. त्याला एका अधिकारी सत्पुरुषाकडून लक्ष्मीला, त्याचप्रमाणे दारिद्रयाची देवता अवदसा हिला प्रसन्न करुन घेण्याचे असे दोन प्रभावी मंत्र मिळाले.

तो गृहस्थ लक्ष्मीच्या मंदिरात गेला, पण तिला प्रसन्न करुन घेण्यासाठी तिची प्रार्थना करायला आलेल्या लोकांची तिथे एवढी झुंबड उडाली होती की, बराच प्रयत्न करुनही त्याला त्या मंदिरात प्रवेश मिळेना.

तितक्यात त्याचं लक्ष जवळच असलेल्या अवदसेच्या मंदिराकडे गेलं. ते मंदीर पाहताच त्याच्या मनात एक वेगळीच कल्पना चमकली व त्याची पावले त्या मंदिराकडे वळली.

त्या मंदीरात शुकशुकाट होता. गाभाऱ्यात असलेल्या मुर्तीपुढे त्याने अनुष्ठान सुरु केले व ते संपताच त्याने तिला प्रसन्न करुन घेण्याचा प्रभावी मंत्र म्हटला. त्याबरोबर प्रकट होऊन तिनं त्याला विचारलं, “ओळखलंस का तू मला? मी अवदसा उर्फ अक्काबाई आहे. माझी आराधना करुन, मला प्रसन्न करु पाहणारा तू पहिलाच माणूस आहेस. बोल, तुला काय हवंय? आहे त्यापेक्षा अधिक दारिद्रय हवं की दुर्बुध्दी हवी? की व्यसनाधीनता हवी? यापैकी तू मागशील ते मी देईन.”

यावर तो गरीब चतूर माणूस हात जोडून तिला म्हणाला, “हे अवदसे! तुझी किंचीतही दॄष्टी माझ्यावर किंवा माझ्या वंशजावर पडू नये, एवढेच माझे तुजकडे मागणे आहे.”

अवदसा शब्दात अडकून गेली होती, तिला त्या गृहस्थाचं मागणं मान्य करावं लागलं. पण त्यामुळे त्या गृहस्थाच्या घरातलं दारिद्रय जाऊन त्याची परिस्थिती भराभर सुधारु लागली.



अक्काबाईची आराधना (चातुर्य कथा) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची