Loading ...
/* Dont copy */

मोहिनी आणि भस्मासूर (चातुर्य कथा)

मोहिनी आणि भस्मासूर (चातुर्य कथा) - विष्णूने मोहिनीचे रुप घेऊन भस्मासुराचा वध केला होता त्याचीच ही चातुर्य कथा मोहिनी आणि भस्मासूर.

मोहिनी आणि भस्मासूर (चातुर्य कथा)

विष्णूने मोहिनीचे रुप घेऊन भस्मासुराचा वध केला होता त्याचीच ही चातुर्य कथा मोहिनी आणि भस्मासूर


मोहिनी आणि भस्मासूर (चातुर्य कथा) - विष्णूने मोहिनीचे रुप घेऊन भस्मासुराचा वध केला होता त्याचीच ही चातुर्य कथा मोहिनी आणि भस्मासूर.



एका धिप्पाड व शक्तीमान राक्षसानं आपल्याला सिध्दी प्राप्त व्हावी म्हणून भगवान शंकराची तपश्चर्या सुरु केली.

खडतर अशा तपश्चर्येनंतर शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले व म्हणाले, “हे राक्षसा! तू केलेल्या तपश्चर्येवर मी प्रसन्न झालो आहे; तेव्हा तू कोणताही एक वर माग. मी तो तुला देईन.”

यावर तो तामसी वृत्तीचा राक्षस म्हणाला, “हे शंकरा! मी ज्याच्या ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन, त्याचे त्याचे भस्म होऊन जाईल अशी सिध्दी तू मला दे. मला दुसरे तिसरे काही नको.”

या राक्षसाला आपण हा वर दिला, तर तो काय अनर्थ करुन सोडील, या गोष्टीचा विचार न करता शंकरांनी “तथा‍ऽस्तु” म्हणून त्याने मागितलेला वर दिला व ते तिथून अंतर्धान पावले. परंतु त्या वरामुळे तो राक्षस एवढा उन्मत्त बनला की, जो दिसेल व त्याला जो नको असेल, त्याच्या मस्तकावर हात ठेवून तो त्याचे भस्म करु लागला. जग त्याला “भस्मासूर” या नावानं ओळखू लागलं व त्याचं नुसतं नाव निघालं तरी चळचळा कापू लागलं.

एकदा तर भस्मासूर प्रत्यक्ष वर देणाऱ्या शंकरांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांचं भस्म करण्यासाठी त्यांचा पाठलाग करु लागला, तेव्हा शंकर मदत मागण्यासाठी विष्णूंकडे गेले.

सरळ द्वंद्वयुध्दात या भस्मासुरापुढं आपला निभाव लागेलच अशी खात्री न वाटल्यानं भगवान विष्णूंनी अत्यंत सुंदर अशा मोहिनी अप्सरेचं रुप घेतलं आणि भस्मासूरासमोर सुंदर अंगविक्षेपांसह नृत्य करायला सुरुवात केली. मोहिनीचं ते अलौकिक रुप पाहून बेभान झालेला भस्मासूर ती नाचेल तसा नाचू लागला व ती हातवारे करी तसे हातवारे करु लागला.

आपल्यावर मोहित झालेला भस्मासूर आता पूर्णपणे देहभान हरपून गेला असल्याचे पाहून मोहिनीचं रुप घेतलेल्या विष्णूंनी आपला हात आपल्या मस्तकावर ठेवला; त्याबरोबर भस्मासुरानेही मोहिनीचे अनुकरण केले आणि आपला हात आपल्या मस्तकावर ठेवून, स्वत:च स्वत:ला भस्म करुन घेतले.



मोहिनी आणि भस्मासूर (चातुर्य कथा) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची