शंकराचं उत्तर - चातुर्य कथा

शंकराचं उत्तर, चातुर्य कथा - [Shankaracha Uttar, Chaturya Katha] केवळ स्वार्थापोटी केलेली भक्ती कधीच सुफळ होत नसते.

केवळ स्वार्थापोटी केलेली भक्ती कधीच सुफळ होत नसते

सबंध वर्षभर उनाडक्या करण्यात घालविलेला एक विद्यार्थी परीक्षा सुरु व्हायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरच्या शंकराच्या देवळात गेला आणि देवळाच्या गाभाऱ्याच्या तोंडाशी उभा राहून व शिवलिंगाकडे तोंड करुन नमस्कार करीत म्हणाला, “भगवन -
(हिन्दी शेर)
हजारोंकी किस्मत तेरे हाथ में है ।
तो मुझे पास करना, क्या तेरे लिये बडी बात है?”

त्याची ती विनंती पूर्ण होताच गाभाऱ्यातून आवाज निघाला - (हिन्दी शेर)
“किताबोंकी किल्ली तेरे हात में है बेटा?”

कर्म टाळून केवळ स्वार्थापोटी केलेली भक्ती कधीच सुफळ होत नसते कारण उत्तम फळे मिळवायची असतील तर सर्वश्रेष्ठ कर्माला पर्याय नसतो.
मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.