निर्धार - मराठी कविता

निर्धार, मराठी कविता - [Nirdhar, Marathi Kavita] क्षणालाही घाबरत नाही, जरी उभं केलंय मृत्युच्या दारात.

क्षणालाही घाबरत नाही, जरी उभं केलंय मृत्युच्या दारात

क्षणालाही घाबरत नाही
जरी उभं केलंय मृत्युच्या दारात
यमालाही परत पाठविण
एवढी हिम्मत ठेवतो उरात

हिम्मत आहे सत्याची
ज्याचे संस्कार झाले घरात
मोडले पण वाकणार नाही
वाढलोय अशांच्या उदरात

होवु द्या वेदना कितीही
जोपर्यंत जीव असेल जीवात
तत्वांशी ती तडजोड नाही
उभ्या जन्मभरात

विध्वंसक असो वा विरोधक
असू दे कितीही जोरात
अगतिकता वा लाचारी
नसेल कधी स्वरात

होवु द्या आघात कितीही
वा निघुद्या मृत्युची वरात
ईश्वराशिवाय कोणालाही
भिक मागणार नाही पदरात


प्रभाकर लोंढे | Prabhakar Londhe
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.