जा गं पोरी शाळेत तू, तू शोध मार्ग दुसरा
जा गं पोरी शाळेत तूतू शोध मार्ग दुसरा
जीवन गेल माझं सारं
उचलता उचलता कचरा
नको येवु माझ्या माघारी
तुला मिळणार नाही आसरा
पोट कधी भरत नाही
इथे दिवाळी असो वा दसरा
या निष्ठूर व्यवस्थेच्या उंबरठ्याशी
मी मारतो आहे चकरा
जीवन संपलय माझ सारं
आता दिवस उरलेय अकरा
घे उंच भरारी तू
जसा उडे आकाशी शिकरा
दाखवून दे एकदा तू
स्त्री जातीचा नखरा
संपवून टाक कचरा सारा
वाहू दे समृद्धीचा वारा
कचरा वाटेवरुन चालताना
दिसू दे तुझा दरारा
जा गं पोरी शाळेत तू
तू शोध मार्ग दुसरा