उषःकाल - मराठी कविता

उषःकाल, मराठी कविता - [Ushaka, Marathi Kavita] उषःकाल झाला मनाच्या अंगणी, उगवला भास्कर पूर्व दिशी.

उषःकाल झाला मनाच्या अंगणी, उगवला भास्कर पूर्व दिशी

उषःकाल झाला मनाच्या अंगणी
उगवला भास्कर पूर्व दिशी
किरणांचे सांडले सडे
प्रकाशाच्या उधळल्या

सडा समार्जन झाले दारी
सजली मोहक रांगोळी
पाखरांची झाली चाहूल
देऊळी नांदल्या भूपाळी

वार्‍याचा मोहक इशारा
अंगाला शहारून गेला
फुलांच्या धुंद सुवासांनी
परिसर सारा बहरुनी आला

गाय हंबरली गोठ्यात
बिलगण्या तिच्या वासरा
मायेनी तयास समीप घेता
सांडू लागल्या दुग्ध धारा

पाखरे निघाली रानोवनी
पिलास शोधण्या चारा
धरती सरसावली पुढे
लागल्या वाहू प्रयत्नांच्या धारा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.