महाराष्ट्र माझा - मराठी कविता

महाराष्ट्र माझा, मराठी कविता - [Maharashtra Majha, Marathi Kavita] महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा, अभिमान माझा स्वाभिमान माझा.

महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा, अभिमान माझा स्वाभिमान माझा

महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा
अभिमान माझा स्वाभिमान माझा

मराठी आमुची भाषा
मस्तकी देश प्रेमाची रेषा

सह्याद्रीच्या डोंगर रांगा
तलवारीची धार आमुच्या अंगा

पराक्रमांची ही भूमी
शूरविरांची नाही इथे कमी

शिवबाचा इतिहास सांगतो वारा
चमकतो संभाजीसारखा सूर्यतारा

ऐकतो तुकारामाची गाथा
टेकतो पंढरपुरी माथा

जाती धर्म जरी अनेक
तरी राहतो आम्ही एक

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.