धमाल क्लासरूम, भयाण वाटे, लाकडी बेंचवर, उगवतात काटे
धमाल क्लासरूमभयाण वाटे
लाकडी बेंचवर
उगवतात काटे
अवघ्या वर्षात पहिल्यांदा
पुस्तकाच्या प्रेमात पडते
त्यास बंद करून ठेवताना
मनोमनी ई रडते
क्वेश्चन पेपर मिळेपर्यंत
मेंदूला लागते रग
हातातले जातात त्राण
जिवाची होते तगमग
पहिल्या प्रश्नांवरती ठरतो
पुढच्या तीन तासांचा मूड
टिचर करणार आहेत दया
का घेणार वर्षभराचा सूड
जोशीने घेतली सप्लिमेंट की
मी माझी कोरी पाणं मोजते
तेवढ्यात हृदयाचा ठोका चुकतो
आणि शेवटची घंटा वाजते
आत्मविश्वास वाढतो मग
परिक्षेतल्या भोपळ्याचा
पश्ताताप होतो मला
दिवसभर झोपण्याचा
उन्हाळ्यात गॅसवर बसवते
ही निर्दयी परिक्षा
अभ्यास करेन पुढच्या वर्षी नक्की
देवा नको के. टी. ची शिक्षा