भेट तुझी माझी जसा तुफान वारा, भेट तुझी माझी जशा थंड थंड गारा
भेट तुझी माझी जसा तुफान वाराभेट तुझी माझी जशा थंड थंड गारा
भेट तुझी माझी जसा आनंदाचा पूर
भेट तुझी माझी जसा खर्जातला सूर
भेट तुझी माझी जसा मनातला उत्सव
भेट तुझी माझी जसे स्वप्नातले वास्तव
भेट तुझी माझी जशी जाईची पाकळी
भेट तुझी माझी जशी लोखंडी साखळी
गुलमोहराचे फूल जसे हलकेच अंगावर पडते
तुझ्या माझ्या भेटीत लवलेली प्रत्येक पापणी स्मरते