गालावरचे गुलाब आता उमलू लागले
आज सकाळी ऊठुन आरशात मी पाहिलेगालावरचे गुलाब आता उमलू लागले
नवलाईचे बोल जणू ओठात साठले
तरुणाईच्या वाटेवर पहिले पाऊल टाकले
बेधूंद मन माझे रानावनात बागडे
कळी चिमुकली पहा मला पाहून बहरे
घुंगरु हे पायातले किती मंजूळ वाजते
तरुणाईच्या वाटेवर पहिले पाऊल टाकले
विचारांचे मेघ मनामध्ये हे दाटले
जुन्या वार्यानेही मह माझ्या मनाला गाठले
आठवणींचे छोटेसे तळे साचले
तरुणाईच्या वाटेवर पहिले पाऊल टाकले
आई पदर तुझा अलगद मी सोडते
जगातले व्यवहार हळुहळु उमजते
संस्काराचा दिवा हाती धरुन चालते
तरुणाईच्या वाटेवर पहिले पाऊल टाकते
आता चांदण्यामध्ये मी माझे स्वप्न शोधते
फुलपानांचे सौदर्य पापण्यात लपवते
असा शब्दांना गुंफून गीत माझे सजवते
तरुणाईच्या वाटेवर पहिले पाऊल टाकते