मी अंधश्रद्धेचा चोर - मराठी कविता

मी अंधश्रद्धेचा चोर, मराठी कविता - [Me Andhashraddhecha Chor, Marathi Kavita] ढोंगी साधूच्या अज्ञानाची, गळ्यात घाली दोरी.

ढोंगी साधूच्या अज्ञानाची, गळ्यात घाली दोरी

ढोंगी साधूच्या अज्ञानाची
गळ्यात घाली दोरी
मनात आले त्याला पूजितो
मी अंधश्रद्धेचा चोर

मांजर आडवे गेल्या समजतो
नुकसान होईल घोर
मनात आले त्याला पूजितो
मी अंधश्रद्धेचा चोर

दृष्ट झाली मीठ मिरची उतरीवतो
समोर आणून पोरं
मनात आले त्याला पूजितो
मी अंधश्रद्धेचा चोर

नवस केल्या बोकड कापितो
होऊन पापीखोर
मनात आले त्याला पूजितो
मी अंधश्रद्धेचा चोर

मंदिर दिसले हात जोडितो
करून भक्तोचा शोर
मनात आले त्याला पूजितो
मी अंधश्रद्धेचा चोर

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.