दगडात भावना नसतांनाही, त्याला देव समजून बसलो
दगडात भावना नसतांनाहीत्याला देव समजून बसलो
दारी आले जनावर
त्याच्यात सृष्टी समजून बसलो
केस सोडून झुले बाई
तिला देव समजून बसलो
कान फुंकुनी मारी मंतर
त्याला डॉक्टर समजून बसलो
देव कोपेल माझ्यावर म्हणून
बामणाच्या हातून पूजा शांती करून बसलो
होते नव्हते सारे काही
त्याच्या चरणी ठेवून बसलो
होते सारे काही तरी
देव्हार्यात आनखी माघीत बसलो
या अंधश्रद्धेच्या जाळ्यात असे मी फसलो
जातीची गाडी सोडून दुसर्याच गाडीत बसलो