जय देव विठाबाई - नैवेद्यारती

जय देव विठाबाई, नैवेद्यारती - [Jai Dev Vithabai, Naivedyaarti] जय देव जय देव जय विठाबाई, पक्वान्नादी सिद्धी अर्पी तुज ठायी.

जय देव जय देव जय विठाबाई, पक्वान्नादी सिद्धी अर्पी तुज ठायी

जय देव जय देव जय विठाबाई ॥
पक्वान्नादी सिद्धी अर्पी तुज ठायी ॥ ध्रु० ॥

षड्रसपक्वान्ने ही अर्पित तुज माई ॥
कृपा करूनी ती तू मान्य करुनि घेई ॥
तृप्ती सर्व जीवा जेविता तु आई ॥
जीवन सर्वांचे हे असे तव पायी ॥ जय० ॥ १ ॥

आनंदे भोजन करावे आता ॥
यथेच्छ जेउनी उच्छिष्ट उरता ॥
तो प्रसाद देई आपुल्या भक्ता ॥
हेचि मागे ठेवुनि तव चरणी माथा ॥ जय० ॥ २ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.