संत नामदेव - मातीतले कोहिनूर

संत नामदेव, मातीतले कोहिनूर - [Sant Namdeo, People] संत नामदेव हे मराठीतील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.

संत नामदेव - २६ ऑक्टोबर १२७० ते ३ जुलै १३५०

नामदेवाचा जन्म पंढरपूरात झाला. शिंपी जातीच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. नामदेवाचे सर्व कुटुंबच अभंग रचना करत असे. हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व हिंदुस्तानी भाषांमध्येही काव्ये रचली.

संत नामदेव यांनी लिहिलेली काव्य रचना ‘गुरुग्रंथ साहेब’ या शिखांच्या धर्मग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे. मानवतेचा संदेश देण्यासाठी त्यांनी भारत भ्रमण केले. मराठीतील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.

संत नामदेवांची अभंगांची गाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत देखील काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केल्या आहेत. त्यातील सुमारे साठ अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपित घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते.

संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.