जय श्रीस्वामी समर्था - अक्कलकोट स्वामींची आरती

जय श्रीस्वामी समर्था, अक्कलकोट स्वामींची आरती - [Jai Shri Swami Samartha, Akkalkot Swaminchi Aarti] जयदेव जयदेव जय श्रीस्वामी समर्था, आरती ओवाळू चरणी ठेवुनिया माथा.

जयदेव जयदेव जय श्रीस्वामी समर्था, आरती ओवाळू चरणी ठेवुनिया माथा

जयदेव जयदेव जय श्रीस्वामीसमर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेवुनिया माथा ॥ ध्रु० ॥

छेली-खेडेग्रामी तू अवतरलासी ।
जगदुद्धारासाठी राया तु फिरसी ॥
भक्तवत्सल खरा तू एक होसी ।
म्हणूनि शरण आलो तूझे चरणासी ॥ जय० ॥ १ ॥

त्रैगुण परब्रह्म तूझा अवतार ।
त्याची काय वर्णू लीला पामर ॥
शेषादिक शिणले, नलगे त्या पार ।
तेथे जडमूढ कैसा करु मी विस्तार ॥ जय० ॥ २ ॥

देवाधिदेवा तु स्वामीराया ।
निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया ॥
तुजसी अर्पण केली आपुली ही काया ।
शरणागता तारी तू स्वामीराया ॥ जय० ॥ ३ ॥

अघटित लीला करुनी जडमूढ उद्धरिले ।
कीर्ति ऐकुनि कानी चरणी मी लोळे ॥
चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले ।
तुझ्या सूता नलगे चरणवेगळे ॥ जय० ॥ ४ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.