आरती सिद्धराया, करू द्वैत सोडोनीया
आरती सिद्धराया ।करू द्वैत सोडोनीया ॥
आशा ममता तृष्णा-बीज ।
टाका तुम्ही जाळोनीया ॥ ध्रु० ॥
चित्सुख परात्पर ।
नाम सिद्धारुढ सार ॥
देव भक्त तूचि होसी ।
क्रीडा करिसी अपार ॥ आरती ० ॥ १ ॥
काम, क्रोध, लोभ ।
देही नांदती स्वयंभ ॥
हेची शत्रू दूर होता ।
आम्हा होसी तू सुलभ ॥ आरती० ॥ २ ॥
भक्ति प्रेम तूज प्रीय ।
म्हणुनि सगुणरूपी सोय ॥
हुबळीत सिद्ध रूपे ।
होसी भक्तांची तू माय ॥ आरती० ॥ ३ ॥
नामाचा तू अभिमानी ।
आले पूर्ण ते कळोनी ॥
कधी नाही उपेक्षिले ।
जे का लागले भजनी ॥ आरती० ॥ ४ ॥
श्रीधर दास तुझे पोर ।
करू नको कधी दूर ॥
अखंडित तुझ्या पायी ।
ठेवा करूनि स्थिर ॥ आरती० ॥ ५ ॥