Loading ...

नामरूपी चालक - एकनाथाची आरती

नामरूपी चालक, एकनाथाची आरती - [Naamrupi Chalak, Eknathachi Aarti] नामरूपी चालक व्यापक तू एक, म्हणुनी एका नामे पाचारिति लोक.

नामरूपी चालक व्यापक तू एक, म्हणुनी एका नामे पाचारिति लोक

नामरूपी चालक व्यापक तू एक ॥
म्हणुनी एका नामे पाचारिति लोक ॥
ज्याचे नामें न चले विषयाचा पंक ॥
जनार्दनाजवळी कीर्तीचा जनक ॥ १ ॥

जय देव जय देव जय एकनाथा ॥
निर्विकार ब्रह्म तूची तत्त्वता ॥
नामे भवकुंजर ताडूनी लाथा ॥
भक्तप्रतिपालक कळिकाळमाथा ॥ ध्रु० ॥

निर्मळ गोदातटी मुनिराज हंस ॥
निर्गुण प्रतिष्ठानी केला रहिवास ॥
लोकत्रयी मिरवी कीर्तीचा घोष ॥
आचार विचार निर्मळ निर्दोष ॥ जय देव० ॥ २ ॥

अपर भानुकूल उगवला भानू ॥
सूर्याचा सूर्य दैदीप्यमानू ॥
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर मानू ॥
कृपादृष्टी करुनी वारिसि रजरेणू ॥ जय० ॥ ३ ॥

भगवद्भावे करुनी सकळांशी मैत्री ॥
जन्म म्हणुनी विश्वामित्राचे गोत्री ॥
विश्व तरले हरिनामाचे मंत्री ॥
पाहू न शके जवळ कळिकाळ नेत्री ॥ जय० ॥ ४ ॥

ब्राह्मणतीर्थी पूजे, नामाचा महिमा ॥
सत्कर्मे लोटली मोक्षाची सीमा ॥
नाना मतांचिया वंदूनी गरिमा ॥
मुक्तेश्वर तेथे धरियेला प्रेमा ॥ जय० ॥ ५ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची