आरती रामदासा - रामदासाची आरती

आरती रामदासा, रामदासाची आरती - [Aarti Ramadasa, Ramdasachi Aarti] आरती रामदासा, भक्तविरक्त ईशा, उगवला ज्ञानसूर्य, उजळोनी प्रकाश.

आरती रामदासा, भक्तविरक्त ईशा, उगवला ज्ञानसूर्य, उजळोनी प्रकाश

आरती रामदासा ।
भक्तविरक्त ईशा ॥
उगवला ज्ञानसूर्य ।
उजळोनी प्रकाश ॥ ध्रु० ॥

साक्षात शंकराचा ।
अवतार मारुती ॥
कलिमाजी तेचि जाली ।
रामदासांची मूर्ती ॥ आरती० ॥ १ ॥

वीसही दशकांचा ।
दासबोध ग्रंथ केला ॥
जडजीवा उद्धरीले ।
नृप शिवासी तारिले ॥ आरती० ॥ २ ॥

ब्रह्मचर्य व्रत ज्याचे ।
रामरूप सृष्टि पाहे ॥
कल्याण तिही लोकी ।
समर्थ सद्गुरुपाय ॥ आरती० ॥३ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.