जय देव पंढरीराया - धूपारती

जय देव पंढरीराया, धूपारती - [Jai Dev Pandhariraya, Dhupaarti] जय देव जय देव पंढरीराया, धूप अर्पितसे मी भावे तव पाया.

जय देव जय देव पंढरीराया, धूप अर्पितसे मी भावे तव पाया

जय देव जय देव पंढरीराया ॥
धूप अर्पितसे मी भावे तव पाया ॥ ध्रु० ॥

सोज्ज्वळ अग्निरूपा निजतेजोराशी ॥
अहंभाव धूप कृपे जाळीसी ॥
त्याचा आनंद माझे मानसी ॥
तव दर्शनमोदे सुख हे सर्वांसी ॥ जय० ॥ १ ॥

पूर्णानंद देवा तू सच्चिदानंदकंदा ॥
परमात्मा तू अससी आनंदकंदा ॥
पूर्ण करी तुची भक्तांच्या छंदा ॥
अंगीकारून धूपा दे ब्रह्मानंदा ॥ जय देव० ॥ २ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.