Loading ...

आरती साईबाबा - साईबाबाची आरती

आरती साईबाबा, साईबाबाची आरती - [Aarti Saibaba, Saibabanchi Aarti] आरती साईबाबा, सौख्यदातारा जीवा, चरणरजतळी.

आरती साईबाबा, सौख्यदातारा जीवा, चरणरजतळी

आरती साईबाबा ।
सौख्यदातारा जीवा ।
चरणरजतळी ।
द्यावा दासा विसावा ।
भाक्ता विसावा ॥ ध्रु० ॥

जाळुनिया अनंग ।
स्वस्वरूपी राहे दंग ।
मुमुक्षु जनं दावी ।
निज डोळा श्रीरंग ॥ आरती० ॥ १ ॥

जया मनी जैसा भाव ।
तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाधना ।
ऐसी तुजी ही माव ॥ आरती० ॥ २ ॥

तूमचे नाम ध्याता ।
हरे संसृतिव्यथा ।
अगाध तव करणी ।
मार्ग दावीसी अनाथा ॥ आरती० ॥ ३ ॥

कलियुगी अवतार ।
सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासे ।
स्वामी दत्त दिगंबर ॥ आरती० ॥ ४ ॥

आठा दिवसा गुरुवारी ।
भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया ।
भवभय निवारी ॥ आरती० ॥ ५ ॥

माझा निजद्रव्य-ठेवा ।
तव चरणरजसेवा ।
मागणे हेचि आता ।
तुम्हा देवधिदेवा ॥ आरती० ॥ ६ ॥

इच्छित दीन चातक ।
निर्मल तोय निजसुख ।
पाजावे माधवा या ।
सांभाळ आपुली भाक ॥ आरती० ॥ ७ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची