जय देवा दत्तराया, स्वामी करुणालया, आरती ओवाळीन, तूज महाराजया
जय देवा दत्तराया ॥स्वामी करुणालया ॥
आरती ओवाळीन ॥
तूज महाराजया ॥ ध्रु० ॥
प्रपंचताट करी ॥
त्रिविधताप निरंजनी ॥
त्रिगूण शुभ्रवाती ॥
उजळिल्या ज्ञान ज्योती ॥ जय देवा० ॥ १ ॥
कल्पना मंत्रपुष्प ॥
भेददक्षिणा वरी ॥
अहंभाव पूगीफल ॥
न्यून पूर्ण सकल ॥ जय देवा० ॥ २ ॥
श्रीपाद श्रीगुरुनाथा ॥
चरणी ठेवूनि माथा ॥
विनवितो दास हरी ॥
अवघा त्रास दूर करी ॥ जय देवा० ॥ ३ ॥