आरती संतमंडळी - संतांची आरती

आरती संतमंडळी, संतांची आरती - [Aarti Santmandali, Santanchi Aarti] आरती संतमंडळी, हाती घेउनि पुष्पांजळी, ओवाळीन पंचप्राणे, त्यांचे चरण न्याहाळी.

आरती संतमंडळी, हाती घेउनि पुष्पांजळी, ओवाळीन पंचप्राणे, त्यांचे चरण न्याहाळी

आरती संतमंडळी ॥
हाती घेउनि पुष्पांजळी ॥
ओवाळीन पंचप्राणे ॥
त्यांचे चरण न्याहाळी ॥ ध्रु० ॥

मच्छेद्र गोरक्ष ॥
गैनी निवृत्तीनाथ ॥
ज्ञानदेव नामदेव ॥
खेचर विसोबा संत ॥
सोपान चांगदेव ॥
गोरा जगमित्र भक्त ॥
कबीर पाठक नामा ॥
चोखा परसा भागवत ॥ आरती० ॥ १ ॥

भानुदास कृष्णदास ॥
वडवळसिद्ध नागनाथ ॥
बहिरा पिसा मुकुंदराज ॥
केशवस्वामी सूरदास ॥
रंगनाथ वामनस्वामी ॥
जनजसवंत दास ॥ आरती ० ॥ २ ॥

एकनाथ रामदास ॥
यांचा हरिपदी वास ॥
गुरुकृपा संपादिली ॥
स्वामी जनार्दन त्यास ॥
मिराबाई मुक्ताबाई ॥
बहिणाबाई उदास ॥
सोनार नरहरी हा ॥
माळी सावता दास ॥ आरती० ॥ ३ ॥

रोहिदास संताबाई ॥
जनी राजाई गोणाई ॥
जोगा परमानंद साळ्या ॥
शेख महंमद भाई ॥
निंबराज बोधराज ॥
माथा तयांचे पायी ॥
कूर्मदास शिवदास ॥
मलुकदास कर्माबाई ॥ आरती० ॥ ४ ॥

नारा म्हादा गोदा विठा ॥
प्रेमळ दामाजीपंत ॥
तुकोबा गणेशनाथ ॥
सेना नरसी महंत ॥
तुळसीदास कसबया ॥
पवार संतोबा भक्त ॥
महिपती तुम्हापासी ॥
चरणसेवा मागत ॥ आरती० ॥ ५ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.