युगानुयुगे पारावर, टाळ वाजतोच आहे, तरीही गावात कलहाचा, गाळ साचतोच आहे
युगानुयुगे पारावरटाळ वाजतोच आहे
तरीही गावात कलहाचा
गाळ साचतोच आहे
चालून झाला माळ सारा
तरीही
उन्हाचा जाळ भाजतोच आहे
अजूनही कुईतरी
मजबुरी म्हणून अबलेच्या
पायातला चाळ वाजतोच आहे
उन्हातान्हात बेमालूमपणे
नांगराचा फाळ राबतोच आहे
किती योजना आल्या गेल्या
सरकार नेहमी त्याला
वाळ टाकतोच आहे
एकनाथावीन गोदाकाठच्या
वाळूत अजूनही अस्पृश्यांचे
बाळ रडतेच आहे
आपण म्हणतो जग बदलले
तरी पण जाती धर्माच्या जात्यात
माणसांची दाळ
चिरतडतेच आहे
किती म्हणून भविष्य द्यावे
अजून कपाळ मागतेच आहे
कितीही झाकले तरी
आभाळ मात्र फाटतेच आहे
इमानदारीत जन्म जातोय
तरी खोटा आळ येतच आहे
माणसांच्या जंगलात माणुसकी मात्र गहाळ होतच आहे
माणसांच्या जंगलात माणुसकी मात्र
गहाळ होतच आहे