Loading ...

अवचितगड किल्ला

अवचितगड किल्ला - [Avachitgad Fort] ३०० मी. उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. कर्जत जिल्ह्यातील रोहा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

अवचितगड किल्ला - Avachitgad Fort

दक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजुबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो

अवचितगड किल्ला - [Avachitgad Fort] ३०० मी. उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. कर्जत जिल्ह्यातील रोहा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. दक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजुबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या पिंगळसई गावापासून गडाची उंची ३०० मी. भरते. घनदाट झाडांमुळे गडावर जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.

अवचितगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


गडावर फारसे पाहण्यासारखे काही नाही. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दुसऱ्या दरवाजात पाण्याने तुडूंब भरलेला तलाव आहे. कुंडातील पाणी एकदम पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. इथल्या रानात रानडुकरे, माकड, बिबळ्या, कोल्हे इ. प्राणी आढळतात. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती, सुधागड, सरसगडा, धनगड, कोरीगड, रायगड, सवाष्णीचा घाट इत्यादी परिसर न्याहाळता येतो.

अवचितगड गडावर जाण्याच्या वाटा


गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.

पिंगळसई मार्ग: अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी अथवा पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथून पायी दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पिंगळसई गावात आपण पोहोचतो. हे अंतर साधारणपणे ५ कि.मी. आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते.

मेढा मार्ग: मुंबई-रोहा मार्गावर रोह्याच्या अगोदर ७.५ कि.मी. असलेल्या मेढा या गावी उतरावे. गावातून विठोबा मंदिराच्या मागूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने आपण एका तासात गडावर पोहोचतो. वाट दाट झाडांमधून जात असल्याने वाट चुकण्याची शक्यता आहे. या वाटेने आपण पडक्या बुरुजावरून गडावर पोहोचतो. बुरुजावरून डाव्या बाजूला कुंडलिका नदीच्या खोऱ्यातील मेढा व पिंगळसई ही गावे दिसतात.

पडम मार्ग: गडावर जाण्याचा तिसरा मार्ग पडम गावातून येतो. रोहा मार्गे पिंगळसई गावाला येताना रोहा नागठाणे मार्गावर एक बंद पडलेला कागद कारखाना आहे. या कारखानाच्या मागून जाणारी वाट गडाच्या दक्षिण प्रवेशद्वारापाशी घेवून जाते. या वाटेने गडावर जाण्यास दोन तास पुरतात.

गडावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय नसल्यामुळे जेवण आपण स्वतः घेवून जावे. तेथे गडावर बारमही पिण्याच्या पाण्याने तळे आहे. किल्ल्यावर पोहचण्यासाठी पिंगळसई मार्गे १ तास तर पडम मार्गे २ तास लागतात.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची