तुझी पावलं - मराठी कविता

तुझी पावलं, मराठी कविता - [Tujhi Pavala, Marathi Kavita] तू असतेस तेव्हा जाणवत नाही एवढ्या प्रकर्षाने तुझे अस्तित्व जाऊ लागतेस दूर जेंव्हा.
तुझी पावलं - मराठी कविता | Tujhi Pavala - Marathi Kavita

तू असतेस तेव्हा जाणवत नाही एवढ्या प्रकर्षाने तुझे अस्तित्व जाऊ लागतेस दूर जेंव्हा

तू असतेस तेव्हा जाणवत नाही
एवढ्या प्रकर्षाने तुझे अस्तित्व
जाऊ लागतेस दूर जेव्हा
कळतनाही
कुठून येतात भिरभिरणारी पाखरं
अन घालू लागतात घिरट्या
क्षणभर ही न स्थिरावता

तुझ्या विचारांच्या फांद्यानीं
कसे बसे बहरून येत असतांना
माझे पानगळीचे दिवस
पुन्हा भेटतात मला नव्याने
अन्‌ पेटवू पाहतात माझ्यात
एका वादळाने भरलेल्या वणव्यास
ज्यामुळे
होऊन जाऊ अस्तित्वहीन आपण

असतील उभ्या जरी
तुझ्या जाण्याच्या क्रमप्राप्त भिंती
माझ्या भक्कम पायावर
तरी देखील कळत नाही
का डळमळत राहतात जातांना
तुझी पावलं
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.