Loading ...
/* Dont copy */

औंढा किल्ला

औंढा किल्ला - [Aundha Fort] ४४०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई डोंगररांगेतील औंढा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो.

औंढा किल्ला - Aundha Fort

औंढाचा किल्ला म्हणजे एक सुळकाच आहे. यामुळे किल्ल्याचा माथा तसा लहानच. याचा उपयोग टेहळणीसाठी होत असे.

औंढा किल्ला - [Aundha Fort] ४४०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई डोंगररांगेतील औंढा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो. सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपुरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. या रांगेचे दोन भाग पडतात. एक म्हणजे अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाई तर पूर्वेकडील औंढा, पट्टा, बितनगड, आड, म्हसोबाचा डोंगर, वृक्षतोडी मुळे हा सर्व परिसर उजाड झालेला आहे. मात्र एस.टी. ची सोय आणि भरपूर पाऊस यामुळे ग्रामीण जीवन बरेच सुखी झालेले आहे. किल्ल्यावरचा भाग म्हणजे एक सुळकाच आहे. औंढाा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या नैऋत्येस आणि देवळालीच्या दक्षिणेस १० मैलांवर आहे.

औंढा किल्ल्याचा इतिहास


इ.स. १६८८ पर्यंत हा किल्ला मराठ्याच्या राज्यात होता. यानंतर तो मोगलांनी जिंकून घेतला. येथे मोगलांचा सरदार श्यामसिंग यांची किल्लेदार म्हणून नेमणूक झाली.

औंढा किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


औंढाचा किल्ला म्हणजे एक सुळकाच आहे. यामुळे किल्ल्याचा माथा तसा लहानच. याचा उपयोग टेहळणीसाठी होत असे. गडावर पाण्याच्या चार-पाच टाक्या आहे. एका गुहेत पाणी आहे. खडकात खोदलेला दरवाजा आहे. समोरच पट्टा किल्ला,बितनगड, अलंग, मदन आणि कुलंग कळसूबाई असा सर्व परिसर दिसतो. गड पाहण्यास अर्धा तास पुरतो.

औंढा गडावर जाण्याच्या वाटा


निनावी मार्गे: मुंबई मार्गे इगतपुरी गाठावी. इगतपुरी बस स्थानका वरून सकाळी सात वाजता भगूर कडे जाणारी एस.टी. पकडून साधारणातः दीड तासाच्या अंतरावरील कडवा कॉलनी नाक्यावर उतरावे. या कॉलनी पासूनच आपली पायपीट चालू होते. कॉलनीतून पुढे गेल्यावर कडवा धरण लागते. धरणाच्या भिंतीवरून पुढे गेल्यावर साधारण नाक्या पासून ४५ मिनिटांत आपण निनावी गावात पोहचतो.

निनावी गावातुन औंढा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिली वाट गावातून समोरच दिसणाऱ्या उभ्या कड्याच्या घळी मधून जाते. ही वाट मात्र मस्त दमछाक करणारी आहे. दुसरी वाट निनावी गावातील दुसऱ्या हनुमान मंदिराजवळून जाते. ही वाट कमी दमछाक करणारी पण पहिल्या वाटेपेक्षा जास्त वेळ लावणारी आहे. यावाटेने किल्ल्याचे पहिले पठार गाठण्यास पाऊण तास लागतो. या पठारावरच औंढाा किल्ला ठेवल्या सारखा दिसतो. येथून किल्ल्याच्या पायऱ्यापर्यंत जाण्यास अर्धा तास लागतो. समोरच कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून गेल्यावर कडा उजवीकडे ठेवून पुढे जावे. वर थोडे प्रस्तरारोहण केल्यावर गडमाथा गाठता येतो.

पट्टा किल्ला मार्गे: अनेक जण औंढा-पट्टा-बितनगड असा ट्रेक सुद्धा करतात. येथून पट्टा किल्ल्याला जाण्यासाठी वरील मार्गाने किल्ल्याच्या पायऱ्या असणाऱ्या पठारावर परतावे. पठारावरून समोरच एक भगवाझेंडा फडकतांना दिसतो. येथून पुढे जाणारी वाट थेट पट्टा किल्ल्यावर जाते.

औंढा किल्ल्याच्या शिवकुंजाच्या मागील बाजूस असणाऱ्या वऱ्हांड्यामध्ये १० ते १२ जणांची रहाण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वतःच करावी. गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी साखळीच्या मार्गेपाउण तास, सात दरवाजा मार्गे दीड तास लागतो.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची