येई हो विठ्ठले - विठ्ठलाची आरती

येई हो विठ्ठले, विठ्ठलाची आरती - [Yei Ho Viththale, Viththalachi Aarti] येई हो विठ्ठले माझे माउली ये, निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे.

येई हो विठ्ठले माझे माऊली ये

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ॥ ध्रु० ॥

आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥

पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.