ठिगळ - मराठी कविता

ठिगळ, मराठी कविता - [Thigal, Marathi Kavita] जाई उसवून धागा, नाही राहीली जागा.

जाई उसवून धागा, नाही राहीली जागा

जाई उसवून धागा
नाही राहीली जागा

दिस कसं हे आलं
उरं फाटूनिया गेलं

कसा कुठून आला
उरात शिरतो भाला

गेली मावळून आशा
गेलं फाटूनी सगळं
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.