कावळ्याचा संदेश - मराठी कविता

कावळ्याचा संदेश, मराठी कविता - [Kavalyacha Sandesh, Marathi Kavita] कावळेदादाला लागली तहान, फिरता फिरता हरपले भान.
कावळ्याचा संदेश - मराठी कविता | Kavalyacha Sandesh - Marathi Kavita

कावळेदादाला लागली तहान, फिरता फिरता हरपले भान

कावळेदादाला लागली तहान
फिरता फिरता हरपले भान
शोधू लागला इकडे तिकडे पाणी
आटून गेली गळ्यातली गाणी

शोधून थकला पाणी काही दिसेना
व्याकूळ झाला काय करावे कळेना
झेप घेऊन गेला उंच झाडावर
माठ दिसे टेकडीवरती दूरवर

उंचावरून घेतली झेप आनंदाने
माठावरती बसून पाहू लागला आशेने
थोडेच होते पाणी तळाला
प्रयत्न करूनही येत नव्हते चोचीला

युक्ती केली मग कावळ्याने
दगड टाकले छोटे छोटे चोचीने
पाणी आले वर वर
पिऊन उडाला भर भर

सांगू लागे दुसऱ्या कावळ्याला
पाण्याची टंचाई भासे आपल्याला
अशी वेळ आता पुढे कधी येऊ नये
पुन्हा कोणी असं व्याकूळ होऊ नये

यासाठी पाणी आडवू पाणी जिरवू
हाच संदेश माणसांना पाठवू
मग होतील माणसे गोळा
पाण्यासाठी भरेल शाळा

उपाय सारे करता येतील
पाण्याने तळे भरता येतील
पाण्याची मग भासणार नाही टंचाई
पाणीच पाणी सारीकडे भरुन राही
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.